सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

मुंबई ( २३ नोव्हेंबर ) : सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांच्या सतर्कतेमुळे लालबाग उड्डाणपुलावरील विजेच्या खांबाला लागलेल्या आगीवर त्वरित नियंत्रण मिळवता आल्याने मोठी दुर्घटना टळली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली होती.

बुधवारी सांयकाळी ७ वाजता सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर आपल्या वाहनाने लालबाग उड्डाणपुलावरून जात होते. त्यावेळी उड्डाणपुलाच्या मधोमध असलेल्या विजेच्या खांबाला आग लागली होती. हे पाहताच त्यांनी आपले वाहन थांबवले. त्यांनी त्वरित अग्निशमन दल आणि पालिकेच्या आपत्कालीन विभागासोबत बेस्ट कार्यालयाला दूरध्वनी करून आगीबाबत माहिती दिली.

आग लागूनही पुलावरून वाहनांची ये जा सुरुच होती. अशावेळी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे अग्निशमन दलाचे वाहन येईतोवर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत आग लागलेल्या विजेच्या खांबापासून वाहनांना दूर केले. घटनास्थळी अग्निशमन दल पोहचून त्यांनी आगीवर त्वरित नियंत्रण मिळविले.

भविष्यात पुन्हा अशी घटना घडली तर त्वरित आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुलाच्या विजेच्या खांबाजवळ रेतीने भरलेल्या बादल्या असाव्यात जेणेकरून आग त्वरित विझवता येऊ शकते, अशी सुचना त्यांनी संबधित वार्डला केल्या आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget