ई-स्कॉलरशीप पोर्टल पुन्हा सुरु ; महाविद्यालयांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई ( २४ नोव्हेंबर ) : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सन 2015-16 व 2016-17 मधील प्रलंबित शिष्यवृत्ती अदा करण्यासाठी ई-स्कॉलरशीप पोर्टल पुन्हा सुरु करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती/शिक्षण फी, निर्वाह भत्ता, विद्यावेतन इत्यादी योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ दिला जातो. सन 2017-18 या वर्षापासून राज्य
शासनाने सर्व विभागाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्या या महा-डिबीटी पोर्टलमार्फत अदा करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे http://mahaeschol.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ संस्थगित करण्यात आलेले आहे.

काही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती/शिक्षण फी/परीक्षा फी/विद्यावेतन/निर्वाह भत्ता इत्यादी लाभ देण्याचे प्रलंबित असल्याने तो अदा करण्यासाठी आता ई-स्कॉलरशीप हे संकेतस्थळ दि. 21 नोव्हेंबर 2017 पासून पुन्हा मर्यादित कालावधीसाठी सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

प्रथम टप्प्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सन 2015-16 साठी दि. 31 मार्च 2016 साठी सन 2016-17 करिता दि. 31 मार्च 2017 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत. परंतु ज्यांना अद्याप शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा इत्यादींचा लाभ मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाकडे प्रलंबित असलेले अर्ज आणि नुतनीकरण करावयाचे प्रस्ताव महाविद्यालयांनी पुनरुज्जीवीत करण्यात आलेल्या संकेतस्थळावरुन दि. 21
नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीत संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांच्याकडे पाठवावेत. 

याबाबत सविस्तर सूचना असलेले परिपत्रक आणि वेळापत्रक हे विभागाच्या www.sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. महाविद्यालयांनी त्यांच्याकडे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन
सादर केलेले सन 2015-16 व 2016-17 चे पात्र विद्यार्थ्यांचे प्रलंबित आणि नुतनीकरणाचे प्रस्ताव त्वरेने सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर, मुंबई उपनगर यांनी केले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget