२६ नोव्हेंबर रोजी संविधान जागर यात्रा

मुंबई ( २३ नोव्हेंबर ) : २६ नोव्हेंबर हा दिवस, संविधान दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. जनतेला संविधानातील मूल्यांप्रती सजग व क्रियाशील होण्याचे आवाहन करण्यासाठी विविध संघटनांनी एकत्र येऊन २६ नोव्हेंबर, २०१७ रोजी संविधान जागर यात्रेचे आयोजन केले आहे.

या यात्रेत मुंबई तसेच राज्यातील अनेक भागातून मोठय़ा संख्येने लोक सहभागी होणार आहेत. त्यात वैदू तसेच अन्य भटक्या, आदिवासी समाजातील मंडळी त्यांच्या पारंपरिक पोषाखांत व कलांसहित सहभागी होणार आहेत. यात्रेत संविधानविषयक अनेक चित्ररथ, लेझिम पथक, गाणी, घोषणा असणार आहेत.

माजी खासदार प्रकाश आंबेडकर, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, विद्यार्थी नेता कन्हैया कुमार, आमदार विद्याताई चव्हाण, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, प्रा. पुष्पा भावे, मा. रामदास भटकळ, माजी खासदार एकनाथ गायकवाड, नगरसेवक रवींद्र पवार आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.

संविधान जागर यात्रा मार्ग व टप्पे ( वेळ : दु. १२ ते सायं. ६.३० ) : देवनार येथील छ. शिवाजी महाराजांचा पुतळा – चेंबूर नाका – अण्णाभाऊ साठे उद्यान- पुणे-मुंबई महामार्गावरुन राणी लक्ष्मी पार्क – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरुन खोदादाद सर्कल – लो. टिळक पूल – कोतवाल उद्यान - एस. के. बोले मार्ग – प्रबोधनकार ठाकरेंचा पुतळा – रानडे रोडवरील सेनापती बापटांचा पुतळा – चैत्यभूमी.

उद्घाटन : दु. १२ वा. पांजरापोळ येथील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यात्रेचे उद्घाटन करतील. याठिकाणी काही प्रतिष्ठितांची/कार्यकर्त्यांची संक्षिप्त भाषणे होतील. त्यानंतर दुपारी १२.३० पर्यंत यात्रा निघणार आहे.

यात्रेचा समारोप : सायंकाळी ५ वा. दादर येथे चैत्यभूमी येथे यात्रेचा समारोप सभेने होणार आहे. या कार्यक्रमाचे संचालन मुमताज शेख करतील. यावेळी प्रमुख भाषणे विद्यार्थी नेता कन्हैया कुमार व माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांची असणार आहेत. समारोपाचा कार्यक्रम एक ते दीडतासाचा असणार आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget