कोल्हापूरच्या शाहू माने यास नेमबाजीत सुवर्ण पदक

नवी दिल्ली, ( २ फेब्रुवारी ) : कोल्हापूरचा नेमबाज शाहू माने याने ‘खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेत’ १० मीटर एअर रायफल प्रकारात आज सुवर्ण पदक पटकविले आहे. मुलींच्या १० मीटर एअर रायफल मध्ये पुण्याच्या नंदिता सुळ हिने रजत पदकाची कमाई केली आहे.

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने दिल्लीत खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धा सुरु असून आज महाराष्ट्राच्या नेमबाजांनी सुवर्ण व रजत पदकांवर नाव कोरले. येथील डॉ. कर्नीसिंह शुटींग रेंज वर झालेल्या सामन्यात कोल्हापूरच्या सेंट झेवियर्स हायस्कुलचा शाहु माने याने १० मीटर रायफल प्रकारात २४७.७ गुणांची कमाई करत सुवर्ण पदक पटकाविले. तामीळनाडूचा रितीक रमेश ला रजत तर दिल्लीच्या पार्थ माखीजाला कांस्यपद मिळाले आहे.

मुलींच्या १० मीटर स्पर्धेत एअर रायफल प्रकारात पुणे येथील बी.आर.घोलप महाविद्यालयाची नंदिता सुळ हीने २४९.३ गुणांसह रजत पदकाची कमाई केली आहे. केवळ २.३ गुण कमी पडल्याने नंदिताच्या हातून सुवर्ण पदक निसटले. चंडीगडच्या झीना खातियाने २५१.६ गुणांसह सुवर्ण तर मध्यप्रदेशच्या याना राठोर ने कांस्य पदक पटकविले.

निल रॉयची आगेकुच

जलतरणात महाराष्ट्राच्या निल रॉयने आज ५० मिटर बटरफ्लाय प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली असून तो सुवर्ण पदकाचा दावेदार मानला जात आहे. तत्पूर्वी निल ने आज २०० मिटर फ्रिस्टाईल प्रकाराच्या कॉलीफाईंग राऊंडमध्ये विक्रमी वेळ नोंदविला आहे.

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने दिल्लीत खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले. देशभरातील १७ वर्षाखालील
शालेय विद्यार्थ्यांनी १६ क्रीडा प्रकारात यात सहभाग घेतला आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget