''हिंदू कोड बिल'' नाटकाचे अधिकार माझ्याकडे - राजेश कुमार

मुंबई (एप्रिल २३) : ''हिंदू कोड बिल'' नाटक मराठी रंगभूमीवर कॅनव्हास थिएटर्सने आणले असून मूळ लेखक राजेश कुमार आहेत. नाटकाचे दोन प्रयोग झाले असताना नाटकाच्या तिसऱ्या प्रयोगावेळी नाटकाचे सर्व अधिकार अनुवादक प्रमोद नवार यांनी सुबोध मोरे नामक व्यक्तीला देऊ केले. मोरे यांनी नाटकाचे अधिकार आपल्याकडे असल्याचा दावा करीत थेट नाटकच बंद करण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली होती. पण आपण कोणत्याही व्यक्तिला नाटकाचे अधिकार दिलेले नसून केवळ कॅनव्हास थिएटर्सला मराठी रंगभूमीवर नाटक करण्याकरीता अधिकृत परवानगी दिलेली आहे. इसलिए ''हिंदू कोड बिल'' नाटक का मै खुद हक्कदार हूँ '', अशा संतप्त शब्दात आपली प्रतिक्रिया राजेश कुमार यांनी ''मराठी १ नंबर बातम्या'' शी दूरध्वनीवरुन बोलताना व्यक्त केली आहे.

दरम्यान, स्वतः कडे हिंदू कोड बिल नाटकाचे सर्व अधिकार असल्याचा दावा करीत सुबोध मोरे यांनी १९ एप्रिल २०१८ रोजी परळ येथील दामोदर नाट्यगृहात रात्रौ ८ वाजता होणारा शो होऊ नये, याकरिता नाट्यगृहाचे व्यवस्थापन ते थेट भोईवाडा पोलीस ठाणे पर्यंत धाव घेतली. पण कॅनव्हास थिएटर्सकडे मूळ लेखकाने नाटक करण्यासाठी अनुमती पत्र दिले असल्याने पोलिसांनी नाटकाचा प्रयोग करण्यास मान्यता दिली होती.

याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, राजेश कुमार लिखित हिंदू कोड बिल नाटक दिल्ली येथे हिंदी भाषेत सुरु आहे. हे नाटक मराठी भाषेत मराठी रंगभूमीवर करण्याची अनुमति राजेश कुमार यांनी कॅनव्हास थिएटर्सला जानेवारी २०१८ रोजी दिली. अनुमति मिळाल्याने कॅनव्हास थिएटर्सने नाटकाचे काम सुरु केले. हिंदी नाटकाचे मराठी भाषेत अनुवाद प्रमोद नवार यांनी केले तर नाटकाचे दिग्दर्शन संजय खिलारी यांनी केले.

प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिर येथे नाटकाचे वाचन, तालीम झाली होती. मार्च महिन्यापर्यंत नाटकाची तालीम सुरु होती. त्यावेळी अनुवादक प्रमोद नवार ही उपस्थित राहत होते. नाटकाची रंगीत तालीम शिवाजी नाट्य मंदिर येथे पार पडली. त्यावेळी ही नवार उपस्थित होते.

नाटकाचा पहिला प्रयोग २८ मार्च २०१८ रोजी दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात झाला होता. त्यानंतर येथेच नाटकाचा दुसरा प्रयोग ६ एप्रिल २०१८ रोजी झाला. नाटकाच्या दोन्ही प्रयोगाला उपस्थित राहिल्यानंतर नवार यांनी थेट स्वतःचे अनुवादकाचे अधिकार सुबोध मोरे यांना देत तेच आता मराठी भाषेत हिंदू कोड बिल नाटकाची मालिका आणि चित्रपट करतील, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे हिंदू कोड बिल नाटक करायचे असल्यास सुबोध मोरे यांची परवानगी घ्यावी अन्यथा शो रद्द केला जाईल, असे त्यांनी नाटकाच्या निर्मात्यांना व्हाट्स अप द्वारे पत्र पाठवून सांगितले. पण याबाबत कोणतेही पूर्व सुचना नवार यांनी न दिल्याने व मूळ लेखक राजेश कुमार यांच्याकडे नाटकाचे सर्व अधिकार असताना अनुवादकने परस्पर नाटक दिल्याने कॅनव्हास थिएटर्सने ईमेल द्वारे नवार यांना नोटिस पाठवली होती.

राजेश कुमार यांनी हिंदू कोड बिल नाटक हिंदी भाषेत प्रथम लिहिले गेल्याने ते मूळ लेखक आहेत. त्यांच्या हिंदी भाषेतील हिंदू कोड बिल नाटकाचे अनुवादन प्रमोद नवार यांनी केले आहे. त्यामुळे ते अनुवादक आहेत. ''कॉपी राइटच्या कायद्यानुसार, मूळ लेखकाकडे नाटकाचे सर्व अधिकार कायम असतात. मूळ लेखकाच्या परवानगी शिवाय अनुवादक स्वतः कोणालाही नाटकाचे अधिकार प्रदान करीत नाटक, मालिका आणि चित्रपट करण्यासाठी परवानगी देऊ शकत नाही. लेखकच कोणालाही कोणत्याही भाषेत नाटक, चित्रपट वा मालिका करण्याकरीता परवानगी देऊ शकतो. मात्र अशी परवानगी अनुवादक कोणाला देऊ शकत नाही'', असे राजेश कुमार यांनी स्पष्ट करीत कॅनव्हास थिएटर्स माझ्या परवानगीनेच मराठी रंगभूमीवर हिंदू कोड बिल नाटक करत असल्याचे म्हटले.

दरम्यान, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना अधिकार मिळावे, याकरिता "हिंदू कोड बिल" तयार केले. परंतु तत्कालीन जातीयवाद्यांना आणि धर्मांध शक्तींना ''हिंदू कोड बिल" द्वारे स्त्रियांना मिळणारे अधिकार मान्य नव्हते. त्या काळी अगदी चतुरतेने "हिंदू कोड बिल" ला इतका विरोध झाला की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ''हिंदू कोड बिल" संसदेत मांडू देण्यास मज्जाव करण्यात आला. स्त्रियांचे अधिकार व महत्व यांना कायदेशीर जडणघडणीत आणण्याचा व सार्वभौम भारत बनवण्याच्या दुरद्रूष्टी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळात हेतुपुरस्सर डावलले गेले. हिंदू कोड बिलाच्या सन्मानार्थ अखेरीस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. हेच नाटकाद्वारे राजेश कुमार लिखित हिंदू कोड बिल नाटकाद्वारे कॅनव्हास थिएटर्सने रंगभूमीवर दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. नाटकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget