बदामवाडी पुनर्विकासाची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करा - रविंद्र वायकर

मुंबई ( ११ मे २०१८ ) : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या गिरगाव येथील बदामवाडी चाळीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या वाडीच्या पुनर्विकासासाठीची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करा, असे निर्देश गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी म्हाडातील आरआर बोर्डाच्या अधिकार्‍यांना दिले. त्याचबरोबर याच वाडीचा पुनर्विकास म्हाडाने करावा, अशी सूचनाही त्यांनी बैठकीत केली.

बदामीवाडीच्या पुनर्विकासाबाबत मंगळवारी राज्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला माजी आमदार अरविंद नेरकर, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्वसन मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे, म्हाडाचे व महापालिकेचे अन्य अधिकारीही तसेच वाडीतील रहिवाशी उपस्थित होते.

गिरगांव बदामवाडी येथे एकंदर ६ इमारती असून, इमारत क्रमांक ३८७ -३८९, ३९१ ए ते ई, सी.एस. क्रमांक १६२२ येथे जुन्या एकुण ६ इमारती आहेत. या इमारतींमध्ये ८८ निवासी तसेच ५७ अनिवासी असे एकुण १४५ रहिवाशी आहेत. या इमारतींच्या पुर्नबांधणीसाठी मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्वसन मंडळाने २८ मे २००९ रोजी रुपये ३, ६३,४८,१२५ इतक्या रकमेस प्रशासकीय मंजुरीही दिली आहे. यातील काही इमारती या धोकादायक म्हणून म्हाडाने घोषित करण्यात आल्या आहेत. या वाडीतील २५ कुटुंबे बींबीसार नगर येथील म्हाडाच्या संक्रमण शिबीरात वास्तव्य करीत आहेत. बदामवाडीचे मालक मे. वर्धमान डेव्हलपर्स यांच्याकडे पुर्नविकासासाठी वेळोवेळी पाठपुरावा करुनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार येथील रहिवाशांनी राज्यमंत्री यांच्याकडे बैठकीत मांडली. बदामवाडीतील मालमत्तेच्या भुसंपादनाची नस्ती गृहनिर्माण विभागाचे सचिव यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती रहिवाशांनी राज्यमंत्री यांना दिली.

यावर या वाडीची जमिनी म्हाडाकडे हस्तांतरीत करण्यासाठी म्हाडा कलम ९३(१) १९७६ नुसार मंजुरी देण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भांगे यांनी राज्यमंत्री वायकर यांना दिली.

यावर निर्णय देताना राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी बदामवाडीच्या पुनर्विकासासाठी आवश्यक ती प्रक्रिया तीन महिन्यांत पुर्ण करावी. म्हाडाने जागा ताब्यात घ्यावी व म्हाडानेच ती डेव्हलप करावी. येथील उर्वरित रहिवाशांना जवळच्या ट्रान्झीट कॅम्पमध्ये स्थलांतरीत करावे. या वाडीच्या पुनर्विकासासाठी तात्काळ टेंडर काढून विकासकाची नेमणुक करण्यात यावी, असे निर्देशही राज्यमंत्री वायकर यांनी मुंबई इमारत दुरूस्ती व पनर्वसन मंडळाच्या अधिकार्‍यांना दिले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget