मुंबई - अक्कलकोट मार्गावर 'शिवशाही' शयनयान बस सेवा सुरु

मुंबई ( १९ मे २०१८ ) : मुंबई - अक्कलकोट (जि. सोलापूर) मार्गावर एसटी महामंडळाची ‘शिवशाही’ शयनयान बस (2x1AC Sleeper) सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविक प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. महामंडळाने माफक दरात वातानुकूलित 'शिवशाही शयनयान' बसची ही सेवा नुकतीच सुरु केली आहे.

ही बस मुंबई सेंट्रल बस स्थानकातून दररोज सायंकाळी ६:३० वाजता निघेल. पुणे, सोलापूर मार्गे अक्कलकोटला पहाटे ४:३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही बस अक्कलकोटवरून रात्री ९:३० वाजता निघेल. बसचा तिकीट दर १ हजार ४० रुपये इतका आहे. बसमध्ये मोफत वायफाय, मोबाईल चार्जिंग प्लग, उशी, ब्लॅंकेट या सुविधेसह प्रवाशांच्या सुरक्षीततेसाठी आगरोधक यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरा या सुविधा आहेत. प्रवाशांना बसचे आगाऊ आरक्षण www.msrtc.gov.in या संकेतस्थळावरून करता येईल. तसेच एसटी महामंडळाने नव्याने तयार केलेल्या msrtc reservation app द्वारेही प्रवासी स्मार्ट फोनवरून आरक्षण करू शकतात.

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून राज्यात २ हजार 'शिवशाही' बसेस एसटीच्या ताफ्यात टप्याटप्याने दाखल होत आहेत. आजपर्यंत 797 शिवशाही बसेस राज्यातील विविध मार्गांवर धावत असून प्रवाशांचा या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याबद्दल मंत्री रावते यांनी प्रवाशांचे आभार मानले आहेत. एसटी महामंडळात दाखल होणाऱ्या २ हजार ‘शिवशाही’ बसपैकी १५० बसेस ह्या ३० आसनी (2x1AC Sleeper) शयनयान श्रेणीतील असून त्या विशेष करून राज्यातील विविध शहरातून दीर्घ पल्ल्याच्या अंतरासाठी चालविल्या जाणार आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget