जगातील सात आश्‍चर्यांच्‍या प्र‍तिकृतींचा समावेश असलेल्‍या जोसेफ बाप्‍टीस्‍टा

उद्यानाचे उद्या स्‍थायी समिती अध्‍यक्षांच्‍या हस्‍ते भूमिपूजन

मुंबई ( १४ मे २०१८ ) : जगातील सात आश्चर्यांच्‍या प्रतिकृतींचा समावेश नव्‍याने नुतनीकरण करण्‍यात येणाऱया जोसेफ बाप्‍टीस्‍टा उद्यानामध्‍ये करण्‍यात येणार असून या कामाचे भूमिपूजन स्‍थायी समिती अध्‍यक्ष यशवंत जाधव यांच्‍या हस्‍ते व अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त डॉ. संजय मुखर्जी (प्रकल्‍प) यांच्‍या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (१५ मे २०१८ ) सकाळी दहा वाजता करण्‍यात येणार आहे.

भंडारवाडा जलाशय, माझगाव येथील जलाशयाच्‍या टेकडीवर हे जोसेफ बाप्‍टीस्‍टा उद्यान असून या उद्यानामध्‍ये जगातील सात आश्‍चर्यांमध्‍ये ख्रिस्‍टरिओचा पुतळा, पिसाचा झुकता मनोरा, मेक्‍सीकोतील चिचेन इल्‍झा, आयफेल टॉवर, रोमन कोलोझि‍म, स्‍टॅुच्‍यु ऑफ लिबर्टी, ताजमहल या सात आश्‍चर्यांचा शिल्‍पाकृतींचा समावेश करण्‍यात येणार आहे. त्‍यासोबतच आवश्‍यक असणारे फॅ‍ब्रिकेशनचे काम व पाया बांधणे, स्‍टेनलेस स्‍टीलचे कुंपण बसविणे, सूचना फलक बसविणे, शिल्‍पाकृतींच्‍या सभोवताली रंगीत दिवाबत्‍ती/ रोषणाई व उद्यानवि‍षयक हिरवळ, सुशोभिकरणे करणे आदीं कामाचा समावेश आहे. सदरहू कामासाठी अंदाजित दीड कोटी रुपये खर्च येणार असून सदर काम सहा महिन्‍याच्‍या कालावधीत पूर्ण करण्‍यात येणार आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget