बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा पुण्यात

मुंबई ( ३० मे २०१८ ) : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्यावतीने बाळासाहेब ठाकरे रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्हयातील उरळी देवाची येथे शनिवार दि. 16 जून रोजी हा मेळावा होणार आहे. दहावी उत्तीर्ण ते पदवीधर मुला-मुलींना या मेळाव्यातून रोजगाराची संधी मिळणार आहे.

कौशल्य विकास विभाग, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, उद्योग संचालनालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यावतीने युवक / युवतींना रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून राज्यभर मेळावे घेतले जाणार आहेत. त्याचा प्रारंभ पुणे जिल्ह्यातील हडपसर परिसरातील उरळी देवाची येथून 16 जून रोजी सकाळी 10.00 ते 02.00 या कालावधीत होणार आहे.

या मेळाव्यात पुणे परिसर व जिल्ह्यातील प्रमुख उद्योग, कारखाने तसेच माहिती तंत्रज्ञान, औषध उत्पादक, हॉटेल उद्योग आदी क्षेत्रातील 80 हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. संबंधित कंपन्या आपल्या प्रतिनिधीमार्फत इच्छुक उमेदवारांची आवड निवड लक्षात घेऊन प्रत्यक्षात नोकरीची संधी उपलब्ध करुन देणार आहेत. या मेळाव्यात कौशल्य विकास व स्वयंरोजगार या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. मेळाव्यात शासनाच्या विविध विभागांची रोजगार-स्वयंरोजगार संबंधीची दालने मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतील. या ठिकाणी इच्छुकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच मेळाव्यानंतरही त्यासंबंधीचा पाठपुरावा केला जाणार आहे.

सीआयआय या उद्योग संघटनेचा या उपक्रमात प्रमुख सहभाग आहे. राज्याच्या विविध भागात अशा प्रकारे मेळावे आयोजित केले जाणार असून त्याद्वारे तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी www.balasahebthackrayrojgarmeleva.com या संकेतस्थळावर 4 ते 10 जून दरम्यान नोंदणी करावी, असे आवाहन उद्योग मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget