वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. अशोक ढवण यांची नियुक्ती

मुंबई ( ३१ मे २०१८ ) : राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर राव यांनी आज डॉ. अशोक श्रीरंगराव ढवण यांची परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली.

डॉ. अशोक ढवण सध्या बदनापूर, जिल्हा जालना येथील कृषी महाविद्यालयात सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य पदावर काम करीत असून त्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी अथवा ते वयाची ६५ पूर्ण करेपर्यंत, यापैकी जे अगोदर होईल ते, करण्यात आली आहे.

विद्यमान कुलगुरू बी. वेंकटेश्वरुलू यांचा कार्यकाळ आज संपत आहे. डॉ. अशोक ढवण यांनी एम.एससी. (कृषी) तसेच भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथून मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र या विषयात पीएच.डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, प्रशासन व संशोधनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश मंजुला चेल्लूर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget