मुस्लिम खाटीक समाजाच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन लवकरच मार्ग काढू - प्रा. राम शिंदे

मुंबई ( २२ जानेवारी २०१९ ) : राज्यातील मुस्लिम खाटीक समाजाचा समावेश इतर मागास प्रवर्गात झाला आहे. मात्र, त्यांना या संबंधी दाखले मिळण्यात येणाऱ्या अडचणीसंदर्भात तातडीने मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन ती मार्ग काढण्यात येईल, असे विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे मंत्री प्रा.राम शिंदे यांनी आज येथे सांगितले.

मुस्लिम समाजातील खाटीक समाजातील विविध समस्यांसंदर्भात आज प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख, खाटीक समाजाचे प्रतिनिधी शहानवाज ठाणवाला, इसहाक खडके, जुल्फेकार पवार आदी यावेळी उपस्थित होते.

मुस्लीम कसाई, मुस्लिम कुरेशी, खाटीक हे एकच असूनही अनेक ठिकाणी त्यांना इतर मागास वर्गाचा दाखला मिळण्यास अडचणी येतात, त्यासाठी शुद्धीपत्रक काढावे, या समाजास दाखले देताना 1967चा व्यवसाय दाखला मागू नये, जातदर्शक आडनाव असल्यास त्यांना जात प्रमाणपत्र मिळावे आदी विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. या सर्व मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत तातडीने बैठक घेऊन त्या सोडविण्यात येतील, असे प्रा. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget