‘राष्ट्रकुल’च्या एंटरप्राईज अॅण्ड इन्व्हेस्टमेंट कौन्सिलच्या अध्यक्षांशी चर्चा

मुंबई ( २१ जानेवारी २०१९ ) : महाराष्ट्रात सुट्ट्या भागांचे निर्मिती करणारे निर्यातक्षम असे लघु आणि मध्यम उद्योग मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्यासाठी राष्ट्रकुल परिषदेकडून मिळणारे प्रोत्साहन महत्त्वपूर्ण ठरू शकेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

राष्ट्रकुल परिषदेच्या एंटरप्राईज अॅण्ड इन्व्हेस्टमेंट कौन्सिलचे अध्यक्ष लॉर्ड मरलॅण्ड, कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलेन जेमेल यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या चर्चेत उद्योग मंत्री सुभाष देसाई तसेच सीआयआयचे पदाधिकारी निनाद करपे, जानकी चौधरी, अपर्णा सुधाकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नव उद्योजकांसह, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहीत करण्यासाठी त्यांच्या क्षमता वृद्धीसाठी अनेकविध प्रयत्न केले जात आहेत. भारतीय उद्योजक महासंघ (सीआयआय) यांच्या समन्वयाने अनेक प्रकल्पही राबविले जात आहेत. महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात विविध प्रकारच्या सुट्ट्या भागांची निर्मिती करणारे असे अनेक लघू आणि उद्यम उद्योग मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्याकडे निर्यातक्षमताही मोठी आहे. त्यामुळे अशा उद्योगांना राष्ट्रकूल परिषदेकडून मिळणारे प्रोत्साहन महत्त्वपूर्ण ठरेल.

कौन्सिलच्या उद्योजकांसाठीच्या प्रोत्साहन योजना-प्रकल्पांतील सहभागाला सकारात्मक प्रतिसाद राहील, असेही मुख्यमंत्री. फडणवीस यांनी सांगितले. यावेळी लॉर्ड मरलॅण्ड यांनी राष्ट्रकूल परिषदेच्या या कौन्सिलकडून राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. तसेच त्यामध्ये महाराष्ट्राने सहभागी व्हावे, असे निमंत्रणही दिले.

यावेळी झालेल्या चर्चेत उद्योग मंत्री देसाई यांच्यासह, सीआयआयचे करपे आदींनीही भाग घेतला.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget