महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहासाठी दीड हजाराहून अधिक अर्ज

मुंबई (१६ जानेवारी २०१९) : राज्यातील उद्योग क्षेत्राला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य नावीन्यता अर्थात इनोव्हेशन सोसायटीच्यावतीने ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह २०१९’ चे आयोजन करण्यात आले आहे. २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या काळात महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. २०१८ मध्ये पहिल्यांदा या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. गेल्या वर्षी तब्बल ९०० स्टार्टअप या उपक्रमात सहभागी झाले होते. महाराष्ट्र स्टार्टअप उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून संपूर्ण देशातून तब्बल १ हजार ५०० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.

महाराष्ट्र स्टार्टअप उपक्रमात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीकडून ५ जानेवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र अनेक स्टार्टअपकडून अर्ज करण्याकरिता मुदत वाढविण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार या उपक्रमाचा भरघोस प्रतिसाद पाहता अंतिम दिनांक १२ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. स्टार्टअप सप्ताहामुळे इच्छुक स्टार्टअपना त्यांच्या अभिनव संकल्पनांच्या सादरीकरणासाठी नामी संधी उपलब्ध होणार असून, यामुळे थेट शासनासोबत काम करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

शिक्षण आणि कौशल्य, आरोग्य सेवा, शेती, प्रदूषण विरहीत ऊर्जा, जल व कचरा व्यवस्थापन, प्रशासन, सर्वसमावेशक आर्थिक विकास या विविध क्षेत्रातील स्टार्टअप्सनी आपले अर्ज ‘महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी’कडे पाठविले आहेत. अर्ज केलेल्यांपैकी उत्कृष्ट १०० स्टार्टअप्सची निवड करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी यांची social Alpha, Intellecap, Omidyar Network, Bharat Innovation Fund, Acumen, Unltd India अशा नावाजलेल्या संस्थासोबत भागीदारी असून उत्कृष्ट ठरलेल्या १०० स्टार्टअप्सना त्यांच्या अभिनव संकल्पना उद्योग जगतातील तज्ज्ञ, गुंतवणूकदार, शासकीय अधिकारी यांच्या समोर मांडण्याची संधी मिळणार आहे.

स्टार्टअप्सनी सादर केलेल्या सादरीकरणाच्या आधारे समितीमार्फत चर्चा होवून त्यातील निवड केलेल्या २४ विजेत्या स्टार्टअप्सना प्रत्येकी रु. १५ लाख रुपयांपर्यंतची शासकीय कामे देण्यात येणार आहेत. याबाबत अधिक माहितीसाठीwww.msins.in, या संकेतस्थळाला भेट द्या. तसेच www.twitter.com/MSInSociety तसेच www.facebook.com/MSInSociety येथे फॉलो करा.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget