राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते मुंबई मॅरेथॉनचे उद्घाटन


मुंबई ( २० जानेवारी २०१९ ) : जगभरातील अव्वल धावपटूंसह बॉलिवूड कलाकार, दिग्गज खेळाडू, उद्योजक, ॲथलेटीक्स यांचा सहभाग असलेल्या मुंबई मॅरेथॉनची सुरुवात राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी गनशॉटद्वारे केली.

या उद्घाटनप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार आशिष शेलार यांच्यासह उद्योग व नाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मॅरेथॉनची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून होऊन याच ठिकाणी शेवट झाला.मुंबई मॅरेथॉनची वैशिष्ट्ये

मॅरेथॉनचे वैशिट्य म्हणजे जेष्ठ नागरिक व अपंगांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला

मुंबई मॅरेथॉनचे आयोजन दरवर्षी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी करण्यात येते

लंडन मॅरेथॉनच्या धर्तीवर मुंबई मॅरेथॉनचे आयोजन होते.

2004 पासून या स्पर्धेला सुरुवात

जगातील एक प्रतिष्ठित मॅरेथॉन अशी ओळख

सहा वेगवेगळ्या विभागात (कॅटेगरी) या स्पर्धेचे आयोजन

जागतिक विजेती मुष्टियुद्ध खेळाडू मेरी कॉम यंदाच्या स्पर्धेची इव्हेंट ॲम्बेसिडर

बॉलिवूड कलाकार, दिग्गज खेळाडू, उद्योजक, ॲथलेटीक्स यांचा सहभाग

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget