मंत्रिमंडळ बैठक : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे शासकीय कृषी महाविद्यालय

मुंबई ( २९ जानेवारी २०१९ ) : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात शासकीय कृषी महाविद्यालय स्थापनेस मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या या महाविद्यालयाची प्रतिवर्ष प्रवेशक्षमता 60 विद्यार्थी इतकी असणार आहे. या महाविद्यालयासाठी आवश्यक 110 पदांच्या निर्मितीसह 63 कोटी 48 लाख इतक्या खर्चास यावेळी मान्यता देण्यात आली. या महाविद्यालयासाठी आवश्यक मनुष्यबळ व इतर सुविधा उपलब्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget