प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभाची शिवाजी पार्क येथे रंगीत तालीम

मुंबई, दि. 24 : शिवाजी पार्क येथे 26 जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची आज येथे रंगीत तालीम करण्यात आली. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या विविध पथकांनी प्रजासत्ताक दिनी सादर करावयाच्या संचलनाचा यावेळी सराव केला.

यावेळी प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे, बृहन्मुंबई पोलीस दलाचे अपर पोलीस आयुक्त विरेश प्रभू, एस. जयकुमार यांच्यासह राजशिष्टाचार विभागाचे तसेच पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी भारतीय नौदल, तटरक्षक दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, राज्य राखीव पोलीस, बृहन्मुंबई पोलीस दल, मुंबई रेल्वे पोलीस दल, मुंबई वाहतूक पोलीस, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, मुंबई अग्निशमन
दल, मुंबईतील विविध विद्यालयातील मुले आणि मुलांची आरएसपी दले, शाळांमधील विद्यार्थ्यांची भारत स्काऊट आणि गाईड्सची पथके, पोलीस दलाची बॅण्ड पथके, राज्य राखीव पोलीस बलाचे पाईप बँड पथक, वाहतूक पोलीस मोटार सायकल पथक, नौदलाची क्षेपणास्त्रे, बृहन्मुंबई पोलीस दलाची ‘रक्षक’ वाहने, महिलांचे
सुरक्षा वाहन पथक, पोलीस सीसीटिव्ही वाहन, ‘वरुण’ वॉटर कॅनन, अग्निशम वाहने, प्रशिक्षित श्वान पथक आदी विविध दलांनी संचलनाची रंगीत तालीम केली.

या रंगीत तालमीदरम्यान बृहन्मुंबई पोलीस दल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, म्हाडा, महावितरण, कृषी विभाग, वन विभाग, रोजगार हमी योजना व जलसंधारण विभाग, आदिवासी विभाग, महावितरण, निवडणूक विभाग, सामाजिक न्याय, आदिवासी
विभाग, पर्यावरण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित वास्तूंचा विकास, पर्यावरण विभाग आदी विविध विभागांच्या चित्ररथांनीही सादरीकरण केले.

यावेळी मागच्या वर्षी शिवाजी पार्क येथे झालेल्या महाराष्ट्र दिनाच्या संचलनात सहभागी झालेल्या तीन उत्कृष्ट पथकांना अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित
करण्यात आले. यात बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथकाने प्रथम क्रमांक, बृहन्मुंबई पोलीस पुरुष सशस्त्र दलाने दुसरा क्रमांक तर राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 व 11 ने तिसरा क्रमांक पटकावला.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget