राज्य सांस्कृतिक पुरस्कार घोषित

मुंबई ( ६ फेब्रुवारी २०१९ ) : सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांच्या घोषणेचा शासन निर्णय आज प्रसिध्द करण्यात आला.

नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, मराठी चित्रपट, किर्तन, शाहिरी, नृत्य, आदिवासी गिरीजन, कलादान, वाद्यसंगत, तमाशा, लोककला या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या कलाकारांना प्रतिवर्षी राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन १९७६ पासून सदरील पुरस्कारांचे वितरण करण्यात येत आहे. या पुरस्कारासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील गठित समितीने २०१८ च्या पुरस्कारांसाठी पुढील मान्यवरांची शिफारस केली होती.

नाटक विभागासाठी रवी पटवर्धन, कंठसंगीतासाठी, माधुरी विश्वनाथ ओक, उपशास्त्रीय संगीतासाठी श्याम देशपांडे, मराठी चित्रपटासाठी उषा नाईक, कीर्तनासाठी ह. भ. प. विनोदबुवा खोंड, शाहिरीसाठी शाहीर विजय जगताप, नृत्यासाठी माणिकबाई रेंडके, आदिवासी गिरीजनसाठी वेणू बुकले, वाद्यसंगीतासाठी पं. प्रभाकर धाकडे, तमाशासाठी चंद्राबाई अण्णा आवळे, लोककलेसाठी मोहन कदम आणि कलादानसाठी श्रीकांत धोंगडे यांना हा पुरस्कार जाहिर झालेला आहे. पुरस्काराचे रु. १ लाख रोख, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे स्वरुप असून सर्व पुरस्कार प्राप्त कलाकारांचे सांस्कृतिक कार्य मंत्री तावडे यांनी अभिनंदन केले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget