काला घोडा महोत्सव

मुंबई ( ८ फेब्रुवारी २०१९ ) : मुंबई येथे सध्या काला घोडा महोत्सव सुरु आहे. या महोत्सवात आदिवासी कलाकारांच्या कलाकृती लोकांपुढे आणण्यासाठी आदिवासी विकास विभागाने पुढाकार घेतला असून आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या वस्तू व चित्र प्रदर्शनाचे स्टॉल महोत्सवात आहेत. त्यास मुंबईकरांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. नागरिकांनी या दालनास भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, राज्य मंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम व प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी केले आहे.

म्हणतात ना प्रत्येक चित्रामागे काही ना काही कथा दडलेली असते, ते चित्र मानवी जिवनाशी निगडीत असेल तर मनास अधिक भावते. अगदी असेच या प्रदर्शनातील चित्रांबाबत झाले आहे. आदिवासींची जीवन, निसर्गाचे महत्व, होळीचा सण, मानव जन्म ते मृत्यू पर्यंतचा काळ अशा विविध कथांवर आधारलेली वारली चित्र या काला घोडा महोत्सवात विशेष आकर्षण ठरत आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासींनी साकारलेली चित्रे, ज्यूट पिशव्या, वारली नक्षी केलेल्या काचेच्या बाटल्या, लाकडापासून बनविलेल्या शोभेच्या वस्तू, पक्षांची घरटी, सुकलेल्या भोपळ्यावरील रेखाटलेली वारली नक्षी, वारली नक्षीचे लाकडी ट्रे तसेच मांजरपाटच्या कपड्यावर लाल माती, कोळसा आणि राखेचा उपयोग करुन केलेली सुबक वारली चित्रे अशी वेगवेगळी उत्पादने या महोत्सवात नागरिकांचे आकर्षण ठरत आहे.

आदिवासींची दोन दालने

कलेल्या माध्यमातून आदिवासी बांधवांना स्वत:ची वेगळी ओळख व्हावी या उद्देशाने आयुष संस्थेच्या मदतीने या महोत्सवात दोन दालने उभारण्यात आली आहेत. अगदी पाचशे रुपये ते 25 हजार रुपयांपर्यंत वारली नक्षींची चित्रे या प्रदर्शनात आहेत. तसेच जव्हार, मोखाडा या भागातील आदिवासींनी तयार केलेल्या उत्पादनाची विक्रीही या प्रदर्शानात होत आहे. अप्रतिम अशा या चित्रांना अगदी परदेशातही मोठी मागणी असते. या आदिवासी कलाकारांनी तयार केलेली वारली चित्रे जपान, पॅरिस येथील प्रदर्शनात ठेवण्यासाठी मागणी असते. डहाणू, बोईसर, पालघर, विक्रमगड येथील आदिवासी कलाकारांनी आपली पारंपरिक कला जपत प्रतिष्ठेच्या या काला घोडा महोत्सवात मानाचे स्थान मिळवले आहे. निश्चितच या कलाकृतींच्या विक्रीतून आदिवासी बांधवांना याचा मोठा लाभ होईल यात शंका नाही.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget