महाराष्ट्रातील 4 कारागृह कर्मचाऱ्यांना सेवा सुधार पदक

नवी दिल्ली ( २५ जानेवारी २०१९ ) : देशातील एकूण 45 कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज सेवा सुधार पदक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील 4 कारागृह कर्मचा-यांचा यात समावेश आहे.

70 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कारागृह अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी सेवा सुधार पदक मंजूर करण्यास मान्यता दिली आहे.

तुरंगसेवेत कैद्याच्या जीवनात चांगला बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या उपक्रमाबद्दल हे सेवा पदक देण्यात येते.

भायखळा जिल्हा कारागृहाचे सुभेदार विजय बाबाजी परब, औरंगाबाद केंद्रीय कारागृह येथील सुभेदार, प्रमोद दादू गायकवाड, येरवडा केंद्रीय कारागृह येथील सुभेदार श्री रामचंद्र तुकाराम पाटील आणि दौलतराव जाधव जेल ऑफिसर ट्रेनिंग कॉलेज, येरवडा पुणे येथील यशवंत अण्णा पवार यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी यावर्षीचे सेवा सुधार पदक जाहीर झाले आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget