उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रपती पोलीस पदक’

महाराष्ट्राला एकूण 44 पदक

नवी दिल्ली ( २५ जानेवारी २०१९ ) : पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 44 पोलीसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील 4 पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता 40 पोलीसांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलीसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी एकूण 855 पोलीस पदक जाहीर झाली असून तीन पोलिसांना मरणोत्तर ‘राष्ट्रपती पोलीस पदक' (पीपीएमजी), 146 पोलीसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी), 74 पोलीसांना उत्कृष्ट सेवा ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएमडीएस ) आणि 632 पोलिसांना ‘पोलीस पदक’ (पीएमएमएस) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 44 पदक मिळाली आहेत.

देशातील 74 पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिका-यांचा समावेश आहे. या अधिका-यांची नावे पुढील प्रमाणे.

1) बिपीन कुमार सिंग, अतिरिक्त पोलीस आयुक्त भ्रष्टाचार विरोधी ब्युरो, वरळी, मुंबई.

2) भास्कर एस. महाडिक, सहाय्यक कमांडंट, राज्य राखीव पोलीस दल, ग्रुप 11,नवी मुंबई.

3) दिनेश भालचंद्र जोशी, सहाय्यक पोलीस आयुक्त, खेरवाडी विभाग, मुंबई.

4) विष्णु जी. नागाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, रत्नागिरी.

यासह महाराष्ट्रातील एकूण 40 पोलीसांना पोलीस पदक जाहीर झाली आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे

1. शहाजी बी. उमप, पोलीस उपायुक्त, झोन-6, चेंबुर, मुंबई

2. मनोज जी. पाटील, पोलीस अधिक्षक , सोलापूर ग्रामीण

3. सतीश बी .माने, पोलीस उपअधिक्षक, पोलीस मुख्यालय कोल्हापूर

4. गणपतराव एस. माडगुळकर, पोलीस उपअधिक्षक, उपविभागीय पोलीस कार्यालय, पुणे ग्रामीण

5. शरद एम. नाईक, सहाय्यक पोलीस आयुक्त, सायन विभाग मुंबई शहर

6. गणपत एच. तरंगे, सशस्त्र पोलीस निरीक्षक, एस.आर.पी.एफ.टीआरजी सेंटर, नानविज दौंड

7. मंगेश व्ही. सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिल-दहीघर पोलीस स्टेशन, ठाणे शहर

8. नितिन आर. अलकनुरे, पोलिस निरीक्षक, एमआयडीसी पोलीस स्टेशन, मुंबई शहर

9. सचिन एस. राणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, नवी मुंबई

10. अरविंद टी. गोकुळे, पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा, पुणे

11. संजय व्ही. पुरंदरे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण , नागपूर

12. नंदकुमार एम. गोपाळे, पोलीस निरीक्षक, खार पोलिस स्टेशन, मुंबई शहर

13. सचिन एम. कदम, पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी दस्ता, गुन्हे शाखा, मुंबई

14. गजानन डी. पवार, पोलीस निरिक्षक, गुन्हे शाखा पुणे शहर, पुणे

15. धनश्री एस. करमरकर, पोलीस निरीक्षक, पोलीस महासंचालक कार्यालय, कुलाबा, मुंबई

16. अनिल मारुती परब, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सीआयओ,राज्य अन्वेशन विभाग, मुंबई

17. अर्जुन ज्ञानदेव शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, पालघर पोलीस स्टेंशन, पालघर

18. सत्यवान महादेव राऊत, पोलीस उपनिरीक्षक, वरिष्ठ अन्वशेन अधिकारी,राज्य अन्वेशन विभाग, मुंबई

19. नंदकिशोर राजाराम शेलार, सहायक पोलीस उपनिरीक्षक, खंडणी विरोधी दस्ता, गुन्हे शाखा, मुंबई

20. अशोक शंकर भोसले, सहायक उपनिरीक्षक, गुन्हे शाखा पुणे शहर, पुणे

21. विलास रघुनाथ मोहिते, सहायक उपनिरीक्षक, भद्रकाली पोलीस स्टेशन,नाशिक शहर, नाशिक

22. प्रदीप गोविंद पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक, पोलीस मुख्यालय,रायगड

23. राजकुमार नथुजी वरूडकर, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक, पोलीस मुख्यालय अमरावती शहर

24. लक्ष्मण कृष्णा थोरात, सहायक उपनिरीक्षक, विशेष शाखा पुणे शहर, पुणे

25. मोहन घोरपडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सातारा

26. गिरिधर काशिनाथ देसाई, सहायक पोलीस उप निरीक्षक, एसआर.पी.एफ. ग्रुप 2, पुणे

27. पुरूषोत्तम बाळकृष्ण देशपांडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, कराड शहर पोलीस स्टेशन, सातारा

28. अमरसिंग किशनलाल चौधरी, सहायक पोलीस उप निरिक्षक, एम.टी. विभाग,औरंगाबाद ग्रामीण, औरंगाबाद

29. मनोहर बसप्पा खाणगांवकर, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक, भ्रष्टाचार विरोधी ब्युरो, कोल्हापूर

30. जाकिर हुसेन गुलाम हुसेन शेख, सहायक पोलीस उप निरीक्षक, गुन्हे शाखा नाशिक शहर, नाशिक

31. दत्तात्रय तुळशीराम चौधर, सहायक पोलीस उप निरीक्षक, भीगवन पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण,पुणे

32. सुनील बाळकृष्ण कुळकर्णी, सहायक पोलीस उप निरीक्षक, स्वारगेट पोलीस स्टेशन , पुणे शहर

33. गणपती यशवंत डफाळे, मुख्य हवालदार, भ्रष्टाचार विरोधी ब्युरो, वरळी, मुंबई

34. कृष्णा हरिबा जाधव, मुख्य हवालदार, खंडणी विरोधी दस्ता , गुन्हे शाखा मुंबई शहर

35. पांडुरंग आर. राजाराम तळवडेकर, मुख्य हवालदार, एन.एम.जोशी मार्ग पोलीस स्टेशन, मुंबई शहर

36. अरुण महादेव कदम, मुख्य हवालदार, कुरार पोलीस स्टेशन , मालाड पूर्व, मुंबई शहर

37. दयाराम तुकाराम मोहिते, मुख्य हवालदार, गुन्हे शाखा ,मुंबई शहर

38. भानुदास यशवंत मानवे, मुख्य हवालदार, विशेष शाखा, शाखा 1, गुन्हे अन्वेशन विभाग, मुंबई,

38. दत्तात्रय पांडुरंग कुढाळे, मुख्य हवालदार, गुन्हे शाखा, मुंबई शहर

40. विनोद प्रल्हादराव ठाकरे, मुख्य हवालदार, एम.टी. विभाग अकोला

केंद्र शासनाच्या सेवेतील दोन मराठी अधिका-यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेल्या देशातील एकूण 74 पोलीस अधिका-यांमधे केंद्रशासानाच्या सेवेत कार्यरत महाराष्ट्रातील दोन अधिका-यांनाही राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. यात केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मुंबई येथील कार्यालयातील सहाय्यक संचालक जीवन रमाकांत कुळकर्णी आणि केंद्रीय अन्वेशन ब्युरोच्या मुंबई कार्यालयातील पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत विठ्ठल पुजारी यांचा समावेशआहे.

केंद्रशासनाच्या सेवेतील आठ अधिकारी कर्मचा-यांना पोलीस पदक

प्रशंसनीय सेवेकरिता पोलीस पदक जाहीर झालेल्या देशभरातील 632 अधिकारी कर्मचा-यांपैकी केंद्रशासनाच्या सेवेत कार्यरत महाराष्ट्रातील आठ अधिका-यांचा समावेश आहे, त्यांची नावे पुढील प्रमाणे.

1) डॉ. मच्छिंद्र रामचंद्र कडोळे, पोलीस अधिक्षक, केंद्रीय अन्वेशन ब्युरो,नवी दिल्ली (कँप मुंबई)

2) टी.ए.रामचंद्रन, सहाय्यक सुरक्षा आयुक्त , बेलापूर मुंबई( रेल्वे मंत्रालय)

3) ओमप्रकाश यादव, मुख्य हवलदार, मुंबई ( रेल्वे मंत्रालय)

4) बसवराज दामोदर गर्ग, उपनिरीक्षक शिवाजीनगर पुणे ( रेल्वे मंत्रालय)

5) अशोक कुमार कहार , उपनिरीक्षक, भुसावळ, ( रेल्वे मंत्रालय)

6) भगवान भाऊसिंह राणे, सहाय्यक उपनिरीक्षक, चालक, नागपूर ( रेल्वे मंत्रालय)

7) रमेश कुमार बोरकर, मुख्य हवलदार, गोंदिया, ( रेल्वे मंत्रालय)

8) दत्तात्रय विश्वनाथ गोडलोलू, मुख्य हवलदार, सोलापूर ( रेल्वे मंत्रालय)
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget