लोकसभा निवडणुकीसाठी 48 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

मुंबई, दि. 22 : लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत आज पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील 17 मतदारसंघापैकी 15 मतदारसंघात एकूण 48 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. आतापर्यंत 16 मतदारसंघात 71 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.

आज लोकसभा मतदारसंघनिहाय नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या आणि कंसात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या सुरुवातीच्या दिवसापासून नामनिर्देशन दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. पहिल्या टप्प्यातील 8- वर्धा लोकसभा मतदारसंघात 5 (6), 9- रामटेक मतदारसंघ 2 (2), 10- नागपूर मतदारसंघ 9 (12), 11- भंडारा- गोंदिया मतदारसंघ 4 (6), 12- गडचिरोली- चिमूर मतदारसंघ 4 (4), 13- चंद्रपूर मतदारसंघात 1 (2) आणि 14- यवतमाळ- वाशिम मतदारसंघात 7 (11) उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.

दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघनिहाय नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या आणि कंसात आजपर्यंत नामनिर्देशन दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 5- बुलढाणा मतदार संघ 1 (1), 6- अकोला 1 (2), 7- अमरावती 1 (5), 15- हिंगोली 2 (2), 16- नांदेड 7 (11), 17- परभणी 1(3), 39- बीड 1 (1), 40- उस्मानाबाद मतदारसंघात आज रोजी तसेच आजपर्यंत 2 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. 42- सोलापूर मतदारसंघात आज नामनिर्देशन पत्र दाखल झाले नसले तरी आजपर्यंत एका उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget