राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजभवन येथे दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा

मुंबई ( २१ मे २०१९ ) : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या अठ्ठावीसाव्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (दिनांक २१) राजभवन येथे सामुहिकरित्या दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.

राज्यपालांचे सचिव बी. वेणूगोपाल रेडडी यांनी राजभवनातील कर्मचारी व अधिकारी, तसेच राजभवन येथील पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा दिली.

अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहण्यात आली.


Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget