मंत्रिमंडळ बैठक निर्णय : 4 जून 2019 - आरोग्य विज्ञान विद्यापीठ कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजना लागू

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैधानिक व शासन मंजूर पदावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजना लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यात आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी 3 जून 1998 रोजी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठास शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या
पदांना आतापर्यंत वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येत नव्हती. आजच्या निर्णयानंतर विद्यापीठात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेसाठी विद्यापीठाच्या स्वनिधीतून कायमस्वरुपी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ही योजना शासनाने विहित केलेला तपशील, अटी व शर्ती
यानुसार लागू होणार आहे.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget