योगा दिन सर्व तालुक्यांमध्ये साजरा होणार -- विनोद तावडे

मुंबई ( १३ जून २०१९ ) : गेल्या चार वर्षांपासून 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी हा दिवस राज्यातील सर्व 288 तालुक्यांमधील तालुका क्रीडा संकुलामध्ये साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यांमध्ये किमान 5 हजार विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आज सिडनहॅम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

तावडे म्हणाले, या वर्षीचा पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन राज्यातील सर्व 36 जिल्ह्यातील 288 तालुक्यांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. या योग दिनामध्ये प्रत्येक तालुक्यातील किमान 5 हजार विद्यार्थी (शाळा/महाविद्यालये/एनएसएस/एनसीसी/स्काऊट गाईड) असे जवळपास 15 लाख विदयार्थी सहभागी होणार आहेत. केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयामार्फत देण्यात आलेला योगबाबतचा प्रोटोकॉल यावेळी विदयार्थी करणार आहेत. राज्यातील योग शिकविणाऱ्या संस्थांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन साजरा होणार आहे. 21 जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. याशिवाय 21 जून रोजी नांदेड येथे रामदेवबाबा यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 1.50 लाख नागरिक सहभागी होणार आहेत.

ज्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे उदाहरणार्थ मुंबई, कोकण किंवा पुणे अशा ठिकाणी पाऊस पडल्यास विद्यार्थ्यांना योग कुठे करता येईल, याबाबतही तयारी करण्यात येणार आहे. आयुष मंत्रालयामार्फत योगासाठी सकाळी 7 ते 8 ही वेळ देण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता याला सुध्दा प्राधान्य देण्यात आल्याचे तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget