वाहन नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

मुंबई ( १३ जून २०१९ ) : मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे दुचाकी, चारचाकी वाहनांची नोंदणी करण्यात येते. सध्या चालू असलेल्या MH-01-DJ ह्या दुचाकी संवर्गातील वाहनांकरिता असलेली मालिका संपुष्टात येत असल्याने MH-01-DL ही नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे तरी वाहनधारकांनी आपल्या पसंतीचा क्रमांक आवश्यक ते शुल्क भरून प्राप्त करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहनांकरिता आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या सुधारित नियम ५४ (अ) यानुसार आगाऊ शुल्क भरून वाहनाचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची तरतूद आहे.

वाहनक्रमांक आरक्षित करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे :

फोटो असलेले ओळखपत्र, निवासाचा पुरावा, पॅनकार्ड, वाहन खरेदीची पावती

मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या खिडकी क्रमांक E-18 वर वाहनक्रमांक आरक्षित करण्याकरिता विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध आहेत. तसेच आवश्यक त्या मार्गदर्शनाकरिता कर्मचाऱ्यांची नेमणूक सुद्धा करण्यात आली आहे.

वाहन नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याकरिता विहित शुल्काचा धनाकर्ष प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) यांच्या नावे सादर करणे आवश्यक आहे. आरक्षित केलेल्या वाहनक्रमांकाची वैधता ३० दिवसांकरिता असून ३० दिवसांच्या आत त्या क्रमांकावर वाहन नोंदणी होणे आवश्यक आहे.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget