"नमामि चंद्रभागा"वर निर्मित माहिती व लघु पटाचे अनावरण

पंढरपूर ( १२ जुलै २०१९ ) : "नमामि चंद्रभागा" प्रकल्पावर निर्मित माहिती पट व लघु पटाचे अनावरण मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरात झाले. विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या माहिती आणि लघु पटांची निर्मिती करण्यात आली आहे.

माहिती पटात भीमा नदीचे महात्म्य सांगण्यात आले असून पुढे पंढरपूर येथे ही नदी चंद्रभागा म्हणून ओळखली जाते. मात्र वाढत्या प्रदूषणामुळे नदीचे पावित्र्य राहिले नाही. त्यासाठी आपण सर्वांनी कोणती काळजी घ्यावी ,याचा संदेश देण्याचा प्रयत्न या माहिती पटात करण्यात आला आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे, पालकमंत्री विजय देशमुख आदी उपस्थित होते.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget