महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमासाठी सूचना आमंत्रित

यवतमाळ ( २७ जुलै २०१९ ) : महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम 1967 व त्याच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये (सहाय्यक अनुदान आणि इमारत व साधनसामग्री अनुदाने यासाठी मान्यता) नियम 1970, महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय संघ (सहाय्यक अनुदानासाठी मान्यता देणे), नियम 1971 महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये, राज्य ग्रंथालय परिषद व जिल्हा ग्रंथालय समित्या (कामकाजाची कार्यपध्दती) नियम, 1973 आणि महाराष्ट्र ग्रंथालयांना (संशोधन व साहित्यिक परिसंस्थाची ग्रंथालये) सहाय्यक अनुदानाकरीता मान्यता देण्याचे नियम 1974 यामध्ये कालानुरूप सुधारणा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

याद्वारे ग्रंथालय चळवळीशी संबंधीत लेखक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक, मुद्रक, प्रकाशक, ग्रंथ विक्रेते, शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी, सेवक, वाचक व सभासद, शैक्षणिक ग्रंथपाल, ग्रंथालय व्यावसायिक, संस्था, लोकप्रतिनिधी, महिला, महाविद्यालय/ विद्यापीठीय ग्रंथालय व माहितीशास्त्राचे प्राध्यापक, संचालनालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रस्तावित अधिनियम व नियमांत सुधारणा, बदल सुचविताना त्याचे बाब निहाय सकारण व योग्य समर्थन करणे आवश्यक आहे. तसेच सुधारणा, अभिप्राय, मत, सुचना इ. विषयक पत्रव्यवहार समक्ष, टपाल, ई-मेलद्वारे ग्रंथालय संचालनालयाच्या अधिपत्याखालील जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांना दिनांक 31 ऑगस्ट 2019 पर्यंत सादर करावा. याबाबतचा संपूर्ण तपशिल ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget