दोन वनरक्षक पुरात वाहून गेले ही घटना अतिशय दुर्देवी

शासन दोन्ही कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभे - सुधीर मुनगंटीवार

मुंबई ( २२ जुलै २०१९ ) : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात झालेल्या पावसाने नदी-नाल्यांना पूर आला. भारंबा गावाजवळील नाल्यामधून जात असताना कन्नड वन परिक्षेत्राच्या साळेगाव बीटचे वनरक्षक राहुल दामोधर जाधव (वय ३०) आणि जैतखेडा बीटचे अजय संतोष भोई (वय २५) हे दोन वनरक्षक वाहून गेले. दोघांचे मृतदेह सापडले आहेत.

ही घटना अत्यंत दुर्देवी असून या दोघांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी आहोत आणि शासन भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. औरंगाबाद प्रादेशिक वनवृत्त कार्यालयाच्या वतीने या दोन्ही कुटुंबियांना तातडीच्या स्वरूपात करावयाची सर्व प्रकारची मदत देण्यात आली आहे. तसेच नियमानुसार जी मदत दिली जाते तीही त्यांना दिली जाईल, असे ही मुनगंटीवार म्हणाले.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget