देशाच्या व मुंबईच्या विकासात कच्छी समाजाचे योगदान मोलाचे - मुख्यमंत्री

मुंबई ( ४ जुलै २०१९ ) : उद्योग व व्यापार क्षेत्राच्या माध्यमातून कच्छी समाजाने देशाच्या व मुंबईच्या विकासात मोलाचे योगदान दिले असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.

घाटकोपर कच्छ विकास समाज व घाटकोपर गुजराती समाजाच्या वतीने आयोजित कच्छरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर, माजी मंत्री प्रकाश मेहता, आमदार राम कदम, समाजाचे अध्यक्ष प्रवीण छेडा, जितेंद्रभाई मेहता आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार व कच्छ रत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

कच्छी भाषेतून शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री म्हणाले, व्यापार, उद्योग याबरोबरच इतरही अनेक क्षेत्रात कच्छी समाजातील नागरिकांनी मोठे कार्य केले आहे. चांगले काम करणाऱ्यांच्या कार्याची दखल घेणे हा त्या समाजाचा सन्मान आहे. युवांपासून ते ज्येष्ठांच्या कार्याचा गौरव करणे ही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी बाब ठरणार आहे. यावेळी मेहता व छेडा यांनीही मनोगत व्यक्त केले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget