महाराष्ट्रात 415 आयएएस, 317 आयपीएस अधिकारी ; दोन वर्षात पदांमध्ये लक्षणीय वाढ

नवी दिल्ली ( २५ जुलै २०१९ ) : महाराष्ट्रात प्रशासकीय आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेचे (आयएएस) 415 आणि भारतीय पोलीस सेवेचे (आयपीएस )317 अधिकारी सद्य:स्थितीत कार्यरत आहेत.

गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार 2016 ते 2018 या कालावधी दरम्यान महाराष्ट्रातील आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात आयएएस अधिका-यांची संख्या 361 हून वाढून 415 झाली आहे तर आयपीएस अधिका-यांची संख्या 302 हून वाढून 317 झाली आहे. प्रधानमंत्री कार्यालय तथा कर्मचारी, जनतक्रार आणि निवृत्ती वेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी राज्यसभेत लिखित उत्तरात ही माहिती दिली .

केंद्र शासनाकडून दर पाच वर्षांनी राज्यांच्या आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात आलेल्या देशातील आयएएस आणि आयपीएस अधिका-यांच्या पदांचा आढावा घेण्यात येतो. याअंतर्गत वर्ष 2016 ते 2018 दरम्यान देशातील एकूण 10 राज्यांचा आढावा घेण्यात आला असून या राज्यांमध्ये एकूण 2 हजार 710 आयएएस अधिकारी असल्याची माहिती आहे. या आढाव्यामध्ये महाराष्ट्रातील आयएएस अधिका-यांच्या संख्येत 361 हून 415 एवढी वाढ झाल्याचे चित्र आहे. वर्ष 2016 ते 2018 दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयासह देशातील एकूण 13 राज्यांमधील आयपीएस अधिका-यांच्या पदांचा आढावा घेण्यात आला असून या राज्यांमध्ये एकूण 2 हजार 277 आयपीएस अधिकारी आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील आयएएस अधिकाऱ्यांच्या संख्येत 302 वरुन 317 एवढी वाढ झाली आहे.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget