महाराष्ट्रातील सहा प्रकल्पांना राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, 18 : केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत आज महाराष्ट्रातील तीन जिल्हयातील महत्वपूर्ण 6 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. जावडेकर यांनी ही माहिती दिली असून या मंजुरीने आदिवासी व वन बांधवांना फायदा होईल तसेच पर्यावरणाचे रक्षण व विकास होणार असल्याच्या भावनाही व्यक्त केल्या.

कोल्हापूर जिल्हयातील सोनवडे-घोडगे हा कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्हयांना जोडणा-या घाट रस्त्याला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची दुस-या टप्प्याची मंजुरी प्रलंबीत होती, आजच्या बैठकीत यास मंजुरी देण्यात आली. यासह अमरावती जिल्हयातील मेळघाट या वनाच्छादीत व आदिवासीबहुल भागातील चौराकुंड-खोपण-खोलमार रोड पासींगच्या कामासह करंजखेडा-हातरू-राजपूर-सेमाडोह या 16 कि.मी. रोड पासींगला मंजुरी देण्यात आली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर भागातून जाणा-या या रस्त्यांचे काँक्रीटीकरण राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या परवानगी अभावी अपूर्ण होते.

चंद्रपूर जिल्हयातील राजगड-पुगलर ट्रांसमीशन लाईन आणि निमगांव लघु पाटबंधा-याच्या कामालाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

याबैठकीत महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, उत्तराखंड आणि मध्यप्रदेशातील प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली .
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget