शासकीय कोट्यातील रिक्त जागा ऑनलाईन विशेष फेरीद्वारे भरण्यात येणार

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे परिपत्रक

मुंबई ( २६ जुलै २०१९ ) : सन 2019-20 या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका (D.El.Ed) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या. मात्र शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीद्वारे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येतील असे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण), पुणे यांच्या www.maa.ac.in संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज करु शकतात. याबाबत सविस्तर सूचना, पडताळणी केंद्राची यादी, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा विद्यार्थी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

1. प्रवेशाची शैक्षणिक पात्रता -इ.12 वी उत्तीर्ण (खुला संवर्ग 49.5 % व मागासवर्गीय संवर्ग 44.5 %)

2.प्रवेश अर्ज ऑनलाईन भरणे – 29 जुलै ते 2 ऑगस्ट 2019

3.पडताळणी केंद्रावर जाऊन मूळ प्रमाणपत्रे पडताळणी करुन घेणे व ऑनलाईन प्रवेशपत्र प्राप्त करणे-दि.29 जुलै ते 3 ऑगस्ट 2019

4.प्रवेश अर्ज शुल्क (ऑनलाईन भरणे)-खुला संवर्ग रुपये 200/-, मागासवर्गीय संवर्ग रुपये 100/-

यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरुन करुन Approve घेतला आहे. परंतु प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपुर्ण किंवा दुरस्ती (Correction) मध्ये आहे. तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले उमेदवार अर्ज पूर्ण भरु शकतात.पडताळणी केंद्रावर जाऊन अर्ज ऑनलाईन Approve केल्याशिवाय उमेदवाराचा प्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांने स्वत:च्या लॉगिनमधूनच प्रवेश घ्यावयाच्या अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करुन लगेचच प्रवेशपत्र स्वत: ईमेल/लॉगिनमधून प्रिंट घेवून अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष प्रवेश घ्यावा. यानंतर (D.El.Ed.) प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असेही पुढे पत्रकात म्हटले आहे.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget