राष्ट्रीय प्रज्ञाशोध राज्यस्तरीय परीक्षा 17 नोव्हेंबरला

मुंबई ( २२ ऑगस्ट २०१९) : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत दहावीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 17 नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज 11 सप्टेंबर 2019 पर्यंत भरता येणार आहे. तर ऑनलाईन विलंब शुल्कासह अर्ज 12 सप्टेंबर 2019 ते 18 सप्टेंबर 2019 पर्यंत भरता येणार आहे.

महाराष्ट्रातील प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेच महत्व अनन्यसाधारण आहे. सन 1963 पासून राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा योजना राबविली जाते. प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करणे हा या योजनेचा गाभा आहे. मुलभूत विज्ञान, सामाजि‍क शास्त्र आणि वाणिज्य यामधील पीएचडी (विद्यापती) पदवी प्राप्त करेपर्यंत सदर शिष्यवृत्ती मिळते. अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन आणि विधी यामधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सदर शिष्यवृत्ती फक्त पदव्युत्तर पदवीपर्यंत देण्यात येते.

या परीक्षेसाठी बसणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आवेदनपत्रे परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in आणि http://nts.mscescholarshipexam.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहेत. सर्व शाळांनी ऑनलाईन आवेदनपत्रे सर्व माहिती व चलनासह 31 डिसेंबर 2019 पूर्वी पूर्ण करुन एनसीईआरटीकडे सादर करावयाची आहेत असे पुण्याच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget