मुंबईत विदेशी बनावट मद्याचा मोठा साठा जप्त

मुंबई ( २९ ऑगस्ट २०१९) : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुंबईमध्ये मोठी धडक कारवाई केली असून यात विदेशी बनावट मद्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत जोगेश्वरी येथे 10 लाखांचा मुद्देमालासह एका आरोपिला अटक करण्यात आली आहे तर दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

उत्पादन शुल्क विभागाने सातांक्रुझ येथे जेठालाल नामक व्यक्तिला बनावट विदेशी मद्याच्या बाटल्यांची वाहतू करताना अटक केली. या व्यक्तीकडे एक लिटरच्या 6 ब्लक लेबल बनावट व्हीस्कीच्या बाटल्या आढळल्या. त्याने तपासात दिलेल्या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केल्यास जोगेश्वरी येथे मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त मद्याची निर्मिती करण्यात येत असल्याची माहीती मिळाली.

जोगेश्वरी येथिल मजासगाव टेकडी मध्ये कैलासपती चाळीत ही टोळी सक्रीय होती. या कारवाईत 77 x 1000 मि.ली बनावट विदेशी मद्य (स्कॉच) तयार बाटल्या, 37x750 मि.ली भरतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या सीलबंद बाटल्या, 10x2000 मि.ली भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या सीलबंद बाटल्या, देशी दारू, 336 x 1000 मि. ली विदेशी मद्य विविध ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या. विविध विदेशी मद्य बाटल्यांचे बनावट बुचे इतर साहित्यासह एकूण 10 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही टोळी उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या लोकांच्या जीवाशी खेळत होती. उच्चाभ्रू वस्तीतील लोकांना हे मद्य ड्युटी फ्री म्हणून विकलं जात होतं. भारतीय बनावटीचे कमी प्रतीचे मद्य विदेशी मद्याच्या वेगवेळया ब्रँडच्या रिकाम्या बाटल्यांनमध्ये भरलं जायचं.त्यावर बनावट बुचाच्या सहाय्याने सिलबंद केले जायाचं. उच्चभ्रु वस्तीतील नागरिकांना ड्युटी फ्री शॉपचे मद्य असल्याचे सांगुन अधिकृत दुकानांच्या किमतीपेक्षा कमी किंमतीत विक्री केली जायची. या गुन्हातील मुळ सुत्रधार व त्यास बनावट बुचे पुरवठा करणारा इसम हे दोघे फरार आहेत. अशा प्रकारे बनावट भेसळयुक्त मद्य शरीरास हानीकारक असुन नागरीकांना शासनाच्या अधिकृत दुकानामधुन मद्य खरेदी करण्याचे आव्हान केले जात आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget