बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यातून 104 जणांना रोजगार – सुभाष देसाई

मुंबई ( ७ ऑगस्ट २०१९) : राज्य शासनाच्या उद्योग विभाग व सीआयआयच्या वतीने वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या अकराव्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.

वरळी येथील बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यासाठी परिसरातील सुमारे तीन हजार इच्छुकांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने नोंदणी केली होती. एकूण 67 कंपन्यांची यासाठी नोंदणी झाली होती. त्यापैकी 50 कंपन्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. 1 हजार 394 मुलांनी प्रत्यक्षात सहभाग नोंदवून मुलाखती दिल्या. त्यापैकी 755 जणांची प्राथमिक फेरीत निवड करण्यात आली. 104 जणांना जागेवर नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते निवड झालेल्या तरुण-तरुणींना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

उद्योग विभाग राबवत असलेल्या या उपक्रमांला सर्वत्र उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी दिसून आले. याबद्दल उद्योगमंत्री देसाई यांनी समाधान व्यक्त केले. या मेळाव्यात सहभागी झालेल्या प्रत्येक तरुण-तरुणीला नोकरी मिळेपर्यंत पाठपुरावा केला जाईल. प्रत्येकाला नोकरी देणे हे आमचे कर्तव्य असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले.

वरळीचे आमदार सुनील शिंदे यांच्या पुढाकाराने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget