केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या परिक्षेचा निकाल जाहीर ; महाराष्ट्रातील 61 उमेदवार उत्तीर्ण

नवी दिल्ली दि. 2: केंद्रीय सशस्त्र दलात भरतीकरिता घेण्यात आलेल्या परिक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला असून देशभरातील 416 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत, यात महाराष्ट्रातील 61 उमेदवारांचा समावेश आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती-2018’ चा अंतिम निकाल आज जाहीर झाला. सीमा सुरक्षा दल(BSF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल(CISF), भारत-तिबेट सीमा पोलीस(ITBP) आणि सशस्त्र सीमा दल (SSB) मध्ये ‘गट अ’ संवर्गातील सहायक कमांडेंट पदाकरिता घेण्यात आलेल्या परिक्षेच्या अंतिम निकालात देशभरातील 416 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यात महाराष्ट्रातील एकूण 61 उमेदवारांचा समावेश आहे.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती करिता 12 ऑगस्ट 2018 ला लेखी परिक्षा घेण्यात आली होती. लेखी परिक्षेत उर्तीण झालेल्या उमेदवारांच्या 24 जून ते 24 जुलै 2019 दरम्यान मुलाखती घेण्यात आल्या. यात यशस्वी झालेल्या उमेदवारांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.

पहिल्या शंभरात महाराष्ट्रातील 14 उमेदवार

महाराष्ट्रातील उमेदवारांनी या निकालात बाजी मारली असून पहिल्या शंभरात राज्यातील 14 उमेदवारांचा समावेश आहे. यात क्रमश: अक्षय पंगारिकर (3), जयेश पाटील (12), सचिन हिरेमठ(14), प्रशांत करंडे(29), दिनेश लवाटे(34), परमेश्वर सेलुकर(37), अमोल पाटील(39), अभंग जोशी (47), स्नेहा पाटील(50), अविनाश जाधवार(70), विजय भगुरे(79), मयुर इंगळे(87), विक्रम घारड(94), सुमीत भालके(100) यांचा समावेश आहे.

यासोबतच महेश तेलंगे (101) , संकेत महाडिक (111), संचित जाधव (118), प्रसाद गोरे (132), ओंकार पवार (169), मयुर नागरगोजे(187), मंदार गोडसे (195), गणेश खोडवे (206), अमीत सुरळकर(214),राशी शिखरवार(219),उमाकांत गिरडकर(220),अमित काकडे(223), मनोज पाटील (224), किरण सोनवणे (225), तुषार पालकर (234), शिरीष जगताप(237), रोहन जवंजाळ(245), अशोक आढावे(246), गौरव वाघ (251), उदय जाधव(267), रजत वाळके(273), निखिल शिराळ(279), राहुल निंबाळकर(280), अजय पोटभरे(289), राहुल मोरे(291), प्रशांत हुकारे(295), अश्विन रहाटे(312), विकास गाढवे (315), सागर बोराडे(319), निखिल वानखडे (323), मनिष मोहोड(330), सुरज रामटेके(336), प्रितम मेस्त्री(339), अक्षय गायकवाड(341), वैभव जाधव(348), विनोद येल्मेवाड (349), सुरज पवार (352), तरूण डोंगरे (361), नितीन इंगळे (368), हर्ष म्हस्के(370), प्रणय साखरे (374), राहुल जाधव (384), अभिजीत बोढारे (385), बापुसाहेब गायकवाड(387), आकाश साबळे(389), बुध्दभुषण निकळजे(391), अक्षय ताकसांडे(394) या महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश आहे.

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget