ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांना (मरणोत्तर) भारतरत्न प्रदान

नवी दिल्ली, दि.8 : महाराष्ट्राचे सुपूत्र ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांना (मरणोत्तर) आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न या बहुमानाने सन्मानित करण्यात आले. नानाजी देशमुख यांचे निकटचे नातेवाईक विरेंद्रजीत सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात आज देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्काराचे राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावर्षी भारतरत्न पुरस्कार घोषित झालेल्या माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, नानाजी देशमुख (मरणोत्तर), प्रख्यात गायक भुपेन हजारीका(मरणोत्तर) यांना सन्मानित करण्यात आले.

नानाजी देशमुख यांचे निकटचे नातेवाईक विरेंद्रजीत सिंह यांनी तर भूपेन हजारीका यांचे पूत्र तेज हजारीका यांनी पुरस्कार स्वीकारला. उपराष्ट्रपती एम. व्यकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती यावेळी उपस्थित होत्या.

नानाजी देशमुख प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते होते. समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले. हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावी 11 ऑक्टोबर 1916 मध्ये नानाजी देशमुख यांचा जन्म झाला. नानाजी यांनी भारतीय संस्कृतीच्या आधारावर मनुष्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो या विचाराला मध्यवर्ती ठेवून देशभर रचनात्मक व शाश्वत विकास साधणारे समाजकार्य केले. पांचजन्य, राष्ट्रधर्म आणि स्वदेश या नियतकालिकांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही नानाजी देशमुख सहभागी झाले. देशातील शेतक-यांना सिंचनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यात त्याचे मोलाचे योगदान राहीले आहे. गोवंश संवर्धन, पारंपरिक कृषी पध्दतीचा विकास व प्रसार, गुरुकुल पध्दतीने शालेय शिक्षण, उद्योजकता विद्यापीठाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराला प्राधान्य,आरोग्यधाम योजनेंतर्गत आयुर्वेदिक वनौषधींविषयी संशोधन आदी महत्वपूर्ण कार्य नानाजींनी केले.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा सर्वोच्च नागरी सन्मान

प्रसिध्द अर्थतज्ज्ञ व ज्येष्ठ राजकारणी म्हणून प्रणव मुखर्जी ओळखले जातात. ते भारत देशाचे 13 वे राष्ट्रपती ठरले. 11 डिसेंबर 1935 मध्ये जन्मलेले प्रणव मुखर्जी हे 6 दशकांच्या सक्रीय राजकारणात लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य राहिले. केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री, संरक्षणमंत्री, वाणिज्य व उद्योग मंत्री आदी पद त्यांनी भुषविली आहेत. भारत देशाचे प्रथम नागरीक अर्थात राष्ट्रपती म्हणून त्यांनी यशस्वीपणे पाच वर्ष कार्य केले.

भूपेन हजारिकांच्या अविट व अमिट सुरांचा सर्वोच्च सन्मान
प्रसिध्द गायक व संगीतकार भूपेन हजारिका यांच्या अविट व अमिट सुरांची दखल घेवून त्यांना मरणोत्तर देशातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले. आसाममध्ये 8 डिसेंबर 1926 मध्ये जन्मलेले हजारिका यांनी वयाच्या 10 व्या वर्षापासून आसमी भाषेत गायनास सुरुवात केली. कलकत्त्यात वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांचे पहिले गाणे रेकॉर्ड झाले होते. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी पहिले गाणे लिहीले. बंगाली गीतांना हिंदीत अनुवादीत करून स्वर देत असत. रूदाली, मिल गयी मंजील मुझे, साज, दरमिया, गजगामिनी, दमन आणि क्यों या सुपरहीट चित्रपटांचे गीत लिहीले. हजारिका यांनी एकूण 1 हजार गीत रचना केल्या व एकूण 15 पुस्तके लिहीली.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget