आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्वेता रतनपुराला कांस्यपदक

तुषार फडतरे आणि ओंकार गुरव यांना उत्कृष्ट पदक

नवी दिल्ली ( २८ ऑगस्ट २०१९) : रशियातील कझान शहरात आयोजित आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्वेता रतनपुराने कांस्यपदक पटकाविले तर तुषार फडतरे आणि ओंकार गुरव यांनी उत्कृष्ट पदक पटकावली आहेत.

रशियातील कझान शहरात आयोजित आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभागी 48 सदस्यीय भारताच्या चमुने विविध कौशल्य स्पर्धेत उत्तम कामगिरी करत 1 सुवर्ण, 1 रजत, 2 कांस्य पदक आणि 15 उत्कृष्ट पदकांची कमाई केली आहे. यात महाराष्ट्र कन्या श्वेता रतनपुराने उत्तम कामगिरी करत ग्राफीक डिझाईन टेक्नॉलॉजी मध्ये कांस्य पदक पटकाविले आहे. तुषार फडतरे याने ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीमध्ये तर ओंकार गुरव याने मोबाईल रोबोटिक मध्ये उत्कृष्ट पदक मिळविली आहेत.

आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत एकूण 63 देशातील 1 हजार 350 स्पर्धकांनी एकूण 53 कौशल्य प्रकारात सहभाग घेतला होता. भारताने 1 सुवर्ण, 1 रजत, 2 कांस्य आणि 15 उत्कृष्ट पदकांची कमाई करत या स्पर्धेत 13 वे स्थान मिळविले आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवडीसाठी केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाच्या वतीने दिल्लीत ३ ते ५ ऑक्टोबर २०१८ दरम्यान राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत सर्वाधिक 23 पदक मिळवून महाराष्ट्र देशात अव्वल ठरला होता. या स्पर्धेत तुषार फडतरे याने सुवर्ण तर श्वेता रतनपुरा आणि ओंकार गुरव यांनी रजत पदकाची कमाई केली होती.
तुषार फडतरे

Post a Comment

[facebook][blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget