(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); २०१७-१८ चे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर | मराठी १ नंबर बातम्या

२०१७-१८ चे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

मुंबई ( २२ जानेवारी ) : नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्य संगीत, मराठी चित्रपट, कीर्तन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन व कलादान या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या मान्यवर व्यक्तींना सन २०१७-१८ च्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सन २०१७-१८ या वर्षीचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त मान्यवर कलाकारांची नावे घोषित केली आहेत.

सन २०१७-१८ या वर्षीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेते पुढीप्रमाणे- सेवा चव्हाण (नाटक), पं. शांताराम चित्ररी गुरुजी (कंठसंगीत), कल्याणी देशमुख (उपशास्त्रीय संगीत), सरोज सुखटणकर (मराठी चित्रपट), नरहरी अपामार्जने (कीर्तन), झरीना बेगम युसूफ सय्यद (तमाशा), शाहीर शिवाजीराव पाटील (शाहिरी), दीपक मुजूमदार (नृत्य), भिकाजी तांबे (लोककला), ओल्या रुपा पाडवी (आदिवासी गिरीजन) आणि माऊली टाकळकर (कलादान). 
राज्य सांस्कृतिक पुरस्काराचे स्वरुप रुपये १ लाख रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल असे आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget