(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात परिमंडळीय उपायुक्तांची आढावा बैठक संपन्न | मराठी १ नंबर बातम्या

महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात परिमंडळीय उपायुक्तांची आढावा बैठक संपन्न

मुंबई ( २२ जानेवारी ) :महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनात महापालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात परिमंडळीय उपायुक्तांची व संबंधित महापालिका अधिका-यांची मासिक आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.


आजच्या बैठकी दरम्यान चर्चिले गेलेले प्रमुख मुद्दे व संबंधित आदेश याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे.


अग्निसुरक्षा विषयक

महापालिका क्षेत्रातील मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तळघर, गोडाऊन, उपहारगृहे इत्यादींची अग्निसुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोहीमस्वरुपात तपासणी व कारवाई करण्यात येत आहे. याबाबत उपायुक्त (विशेष) श्रीमती निधी चौधरी यांनी आजच्या बैठकीदरम्यान संगणकीय सादरीकरण केले.

सदर सादरीकरणानुसार अग्निसुरक्षा विषयक तपासणी व कारवाई करण्यासाठी ५२ चमूंचे गठन करण्यात आलेले आहे. या चमूंमध्ये महापालिकेच्या प्रशासकीय विभाग कार्यालयातील इमारत व बांधकामे खाते, अतिक्रमण व निर्मूलने खाते, सार्वजनिक आरोग्य खाते व मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी / कर्मचा-यांचा
समावेश आहे.

गेल्या काही दिवसात महापालिका क्षेत्रातील ४० चित्रपटगृहे / नाट्यगृहांची (Theatre) अग्निसुरक्षेच्या दृष्टीकोनातून तपासणी करण्यात आली. ज्यापैकी ६ ठिकाणी नोटीस / तपासणी अहवाल (Inspection Report) देण्यात आले. या तपासणी अहवालामध्ये नमूद केलेल्या त्रुटींची पुर्तता संबंधितांद्वारे निर्धारित कालावधी दरम्यान करणे आवश्यक असते.

गेल्याकाही दिवसांत ५४ मॉल्सची देखील तपासणी करण्यात आली. यापैकी ३७ बाबत नोटीस / तपासणी अहवाल देण्यात येऊन ४ ठिकाणी तोडकाम कारवाई करण्यात आली. तर २ ठिकाणी 'सील' करण्याची कारवाई करण्यात आली.

५८ तळघरांची (Basement) तपासणी करण्यात आली. यापैकी २४ बाबत नोटीस / तपासणी अहवाल देण्यात आले. ४ ठिकाणी तोडकाम कारवाई करण्यात आली. तर १२ ठिकाणी 'सील' करण्याची कारवाई करण्यात आली.

१७ गोदामांची (Godown) तपासणी करण्यात आली. ज्यापैकी १५ गोदामांना नोटीस / तपासणी अहवाल देण्यात आले. तर एका ठिकाणी तोडकाम कारवाई करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून पासून अग्निसुरक्षेच्या दृष्टीकोनातून ५ हजार २६९ आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणी मोहिमेदरम्यान २ हजार ९७३ आस्थापनांना नोटीस / तपासणी अहवाल देण्यात आले. ६८४ ठिकाणी तोडकाम कारवाई करण्यात आली, तर ७२ आस्थापनांवर 'सील' करण्याची कारवाई करण्यात
आली आहे, अशीही माहिती आजच्या बैठकीदरम्यान संबंधित खात्याद्वारे देण्यात आली.

महापालिकेद्वारे सुरु करण्यात आलेल्या अग्निसुरक्षा विषयक तपासणी मोहिमेदरम्यान ज्या आस्थापनांना त्रुटींच्या अनुषंगाने नोटीस / तपासणी अहवाल देण्यात आले आहेत; त्या आस्थापनांनी आवश्यक त्या बाबींची पूर्तता निर्धारित कालावधी दरम्यान करवून घेणे आवश्यक आहे. यानुसार आवश्यक त्या बाबींची पूर्तता झाली असल्याची पुनर्तपासणी तातडीने सुरु करण्याचे व ज्याठिकाणी अपेक्षित बाबी झाल नसतील, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान दिले आहेत.

त्याचबरोबर अग्निसुरक्षा विषयक तपासणी मोहीमेदरम्यान ज्याठिकाणी तोडकाम कारवाई झाली असेल, त्याठिकाणी देखील पुनर्तपासणी करावी. या तपासणी दरम्यान तोडकाम केलेल्या बाबींचे पुनर्बांधकाम झाल्याचे आढळून आल्यास संबंधित आस्थापनेवर कठोर कारवाई करावी, असेही निर्देश आजच्या बैठकी दरम्यान देण्यात आले आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget