राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी आज डॉ. आशिष पातुरकर यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. पातुरकर यांची नियुक्ती पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे. आदित्य कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ ७ सप्टेंबर २०१७ रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
डॉ. पातुरकर यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून पशू विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी व पीएच.डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन व संशोधनाचा व्यापक अनुभव आहे. माफ्सु विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहापात्रा आणि पशू, दुग्ध व मत्स्य विभागाचे सचिव विकास देशमुखहे समितीचे सदस्य होते.
टिप्पणी पोस्ट करा