(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); "शाळेत असताना मला संगीत शिकता आलं नाही!" - जावेद अख्तर | मराठी १ नंबर बातम्या

"शाळेत असताना मला संगीत शिकता आलं नाही!" - जावेद अख्तर

मुंबई ( ३१ जानेवारी ) : "लहान असताना आमची आर्थिक स्थिती वाईट होती. आई वारली होती. मी नातेवाईकांकडे वाढत होतो. वडील दुसरीकडे रहायचे. संगीताची खूप आवड असूनही मला आर्थिक स्थितीमुळे लहान वयात संगीत शिकता आलं नाही," अशा शब्दांत हिंदी-उर्दू कवी, साहित्यिक व अनेक हिंदी सिनेमांचे ख्यातनाम गीतकार जावेद अख्तर यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली. शंकर महादेवन अकादमीच्या वतीने राबविण्यात येणा-या 'इन्स्पायर इंडिया' या उपक्रमाचा शुभारंभ आज सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलमध्ये झाला. त्यावेळी उदघाटक म्हणून जावेद अख्तर बोलत होते.

"तळागाळातील तसंच आर्थिकदृष्ट्या निम्न वर्गातील शालेय विद्यार्थ्यांना संगीताचं शिक्षण मिळावं, त्यांच्यात संगीताची आवड निर्माण व्हावी या हेतूने 'इन्स्पायर इंडिया' हा उपक्रम मुंबईत अनेक ठिकाणी राबविण्यात येणार आहे. पैसे नाहीत म्हणून संगीतापासून कुणीही वंचित राहू नये, ही आमची यामागची भावना आहे", अशी माहिती बाॅलीवडचे सुप्रसिद्ध गायक-संगीतकार व 'इन्स्पायर इंडिया'चे संस्थापक शंकर महादेवन यांनी यावेळी दिली. तर डी. एस. हायस्कूलचे मुख्य विश्वस्त राजेंद्र प्रधान म्हणाले, "शाळेतील मुलांना गेल्या दीड वर्षापासून शंकर महादेवन यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताचे प्रशिक्षण मिळत आहे. संगीतामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक ताण तर कमी होतोच, पण त्याचबरोबर त्यांच्यातील अभ्यासेतर गुणांना प्रोत्साहनही मिळते. पियानो, गिटार, तबला, हार्मोनियम अशा सर्वच वाद्यांनी सुसज्ज अशा आमच्या शाळेतील संगीतवर्गाचा लाभ आज शेकडो विद्यार्थी घेत आहेत. 'इन्स्पायर इंडिया'मुळे ही संधी आता आणखी असंख्य विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. "

'इन्स्पायर इंडिया'च्या आजच्या या पहिल्या कार्यक्रमात डी. एस. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मराठी-हिंदी-इंग्रजीच नव्हे तर जपानी गाणी गाऊन उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच दिला. शाळेच्या नवरे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसंच रसिकांनी खच्चून गर्दी केली होती.

जावेद अख्तर : "विद्यार्थ्यांना संगीताचं प्रशिक्षण देण्यासाठी शंकर महादेवन अकादमी व डी. एस. हायस्कूल जे प्रयत्न करत आहेत, ते अत्यंत स्तुत्य आहेत. त्यांचे करावे तितके कौतुक थोडेच. आज संगीताचं जे बीज शंकर महादेवन व राजेंद्र प्रधान रोवत आहेत, त्यातून भविष्यात संगीतविश्वातील महावृक्षनिर्माण होणार आहेत."
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget