(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अनाथ मुलांना 1 टक्के आरक्षण देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय | मराठी १ नंबर बातम्या

अनाथ मुलांना 1 टक्के आरक्षण देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई ( १७ जानेवारी ) : राज्यातील अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्के समांतर आरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. अनाथ मुलांचे पुनर्वसन करणे तसेच त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने शासनाने घेतलेला हा निर्णय संवेदनशील व पुरोगामी आहे, असे त्या म्हणाल्या.

मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, अनाथ मुलांना त्यांचा संस्थेतील कालावधी संपल्यानंतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अनाथ मुलांची जात नक्की माहिती नसल्याने त्यांना कोणत्या एका विशिष्ट प्रवर्गात समाविष्ट करता येत नाही. त्यामुळे त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलतीपासून वंचित रहावे लागते. त्यामुळे त्यांच्या भावी आयुष्यात अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात 1 टक्के समांतर आरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget