(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पदोन्नती आरक्षण वाचवण्यासाठी सर्व संघटनांना सोबत घेऊन न्यायालयीन लढाई लढणार- आनंदराज आंबेडकर | मराठी १ नंबर बातम्या

पदोन्नती आरक्षण वाचवण्यासाठी सर्व संघटनांना सोबत घेऊन न्यायालयीन लढाई लढणार- आनंदराज आंबेडकर

मुंबई ( ३१ जानेवारी ) : सरकारी नोकरीतील कर्मचाऱ्यांचे पदोन्नती जाणार की काय, अशी टांगती तलवार कर्मचाऱ्याच्या मानेवर येऊन ठेपले असताना याच विषयावर वेगवेगळ्या संघटनाच्यावतीने सुप्रीम कोर्टात लढा सुरु असल्याने सरकारी नोकरीतील पदोन्नतीचे आरक्षण संपुर्ण पणे धोक्यात आले आहे. याकरीता सर्व संघटनांना एकत्रित करून लढा देणार असल्याचे रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी आज घोषित केले.

आता पर्यंत आरक्षणाचे फायदे घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आव्हान करताना रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले की, स्वतःचे आरक्षण वाचवुन येणाऱ्या पिढीच्या भविष्यात यांना आरक्षण कायम ठेवण्यासाठी कोर्टात वेगवेगळे लढल्यास कर्मचारी अधिकारी यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आनंदराज आंबेडकर यांनी स्वतःच्या दालनात आज बैठक बोलावली. यामध्ये सर्वच संघटनाना सोबत घेऊन सुप्रीम कोर्टात आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वात मोठा वकील देऊन आरपारची लढाई लढण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याविषयी सर्व संघटना व प्रमुख कर्मचारी - अधिकारी यांना पुढील बैठकीत बोलून पुढील रणनीती ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget