(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); जी.डी.सी. ॲण्ड ए व सी.एच.एम परिक्षेचा निकाल घोषित | मराठी १ नंबर बातम्या

जी.डी.सी. ॲण्ड ए व सी.एच.एम परिक्षेचा निकाल घोषित

मुंबई ( २३ जानेवारी ) : जी.डी.सी. ॲण्ड ए व सी.एच.एम परिक्षेचा निकाल दि. 11 जानेवारी रोजी घोषित करण्यात आला आहे. ही परीक्षा 25, 26 व 27 मे 2017 रोजी घेण्यात आली होती.

हा निकाल https://gdca.maharashtra.gov.in/https://sahakarayukta.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर पहावयास उपलब्ध आहे.

फेरगुण मोजणी करण्यासाठी दि. 12 फेब्रुवारी रात्री 12 पर्यंत https://gdca.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर परीक्षार्थींनी आपले लॉगइन व पासवर्डचा वापर करुन अर्ज करावा.

फेरगुण मोजणी करण्यासाठी परिक्षार्थी यांनी फेरगुणमोजणी शुल्क भारतीय स्टेट बँक (SBI) या बँकेच्या कोणत्याही जवळच्या शाखेत प्रत्येक विषयासाठी 75 रुपये अधिक बँक चार्जेस याप्रमाणे चलनाद्वारे
भरावेत. बँकेचे चलन ऑनलाईन प्राप्त करुन घेण्याची मुदत 12 फेब्रुवारी रात्री 12 पर्यंत राहील. हे चलन बँकेत 16 फेब्रुवारी 2018 पर्यंत भरणा करावेत. विहीत तारखेनंतर प्राप्त अर्जांचा विचार करण्यात येणार नाही, असे
जिल्हा केंद्र प्रमुख तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई यांनी कळविले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget