मुंबई ( १८ जानेवारी ) : बृहन्मुंबई महानगरपालिकेने 'ड' संवर्गातील १३८८ रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक ११ डिसेंबर, २०१७ रोजी जाहिरात दिली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने एकूण २ लाख ८७ हजार ०८८ उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाले आहेत. दिनांक २४ जानेवारी, २०१८ पासून ऑनलाईन परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना ओळखपत्र ऑनलाईन पद्धतीने पाठविण्यात येणार आहेत.
तसेच दिनांक १५ फेब्रुवारी, २०१८ ते दिनांक २५ फेब्रुवारी, २०१८ पर्यंत महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांच्या ठिकाणी ऑनलाईन परिक्षा आयोजित करण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आला असल्याचे महापालिका कामगार विभागाने कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा