(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); एलिफंटा महोत्सवाला जाण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून लाँच सेवा | मराठी १ नंबर बातम्या

एलिफंटा महोत्सवाला जाण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून लाँच सेवा

मुंबई ( २५ जानेवारी ) : घारापुरी बेटांवर आयोजित एलिफंटा महोत्सवामध्ये अभ्यागतांना सहभागी होता येऊ शकते. हे बेट मुंबईपासून १० किलोमीटर अंतरावर आहे. या महोत्सवासाठी २७ व २८ जानेवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथून सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत नियमित लाँच सेवा असेल आणि रात्री ९ ते १०.१५ या वेळेत परतीच्या प्रवासासाठी लाँच सेवा उपलब्ध असेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने दिली आहे.

युनेस्कोच्या जागतिक वारसा ठिकाणांच्या यादीत स्थान मिळविलेल्या जगप्रसिद्ध एलिफंटा लेण्यांच्या परिसरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) येत्या २७ व २८ जानेवारी २०१८ रोजी २९ व्या एलिफंटा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या २ दिवसीय महोत्सवातील प्रमुख आकर्षणे

पहिला दिवस - २७ जानेवारी, वेळ - सायंकाळी ७ ते रात्री ९

झिया नाथ आणि सनातन चक्रवर्ती यांचा 'डान्स ऑफ लव्ह' हा नृत्याविष्कार

फ्युजन तबला, बासरीवादन आणि कीबोर्ड वादन

समीर नागदेव डान्स आर्ट्सतर्फे ध्रुत नृत्य


दुसरा दिवस - २८ जानेवारी, वेळ - सायंकाळी ६ ते रात्री ९.४०

वडाली बंधुंची सूफी मैफल

हंस राज हंस यांची सूफी मैफल

नितीश भारती यांची वाळू कला

डॉ. परिणिता शहा यांचा कथक नृत्याविष्कार

ऐश्वर्या आणि स्मृती बेदाणे यांचे लावणी नृत्य
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget