मुंबई ( १७ जानेवारी ) : महाराष्ट्रातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना येत्या मार्चपासून टेट्रा पॅकमधून सुगंधी दूध पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी काल येथे दिली.
सवरा पुढे म्हणाले, 200 मि.ली. एवढ्या परिमाणात जीवनसत्वयुक्त सुगंधी दुधाचा पुरवठा आदिवासी विद्यार्थ्यांना ते शिकत असलेल्या शाळांमध्येच करण्यात येणार आहे. हा दूध पुरवठा करण्याची जबाबदारी महानंद या सहाकरी दुग्ध संस्थेवर सोपविण्यात येणार आहे. पालघरपासून ते गडचिरोली सारख्या दूर अंतरावरील आदिवासी क्षेत्रात असलेल्या आदिवासी शाळांमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना हे गुणवत्तापूर्ण दूध पुरविण्यात येणार आहे. टेट्रापॅकमध्ये विशिष्ट तपमानाला पॅकबंद केलेले हे दूध कमाल दोन महिन्यापर्यंत सुस्थितीत राहत असल्यामुळे ते आरोग्यदारी ठरणार आहे. ही योजना 1 मार्च 2018 पासून संपूर्ण राज्यभर कार्यान्वित करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे सवरा यांनी शेवटी सांगितले.
महानंद संस्थेने या सुगंधी दूध पुरवठ्याच्या अनुषंगाने वाहतूक खर्चासह दुधाचे प्रतिलिटर दर, गुणनियंत्रण, परिवहन व संनियंत्रण तसेच वितरण व्यवस्था व अन्य तांत्रिक बाबीसह या विषयावर लवकरात लवकर
प्रस्ताव द्यावा, तसेच या संबंधाने सादरीकरण करण्यात यावे, असे निर्देश आदिवासी विभागाच्या प्रधान सचिव वर्मा यांनी यावेळी दिले.

टिप्पणी पोस्ट करा