(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण | मराठी १ नंबर बातम्या

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई ( २६ जानेवारी ) : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईचे महापौर प्रिं.विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या हस्ते बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयात आज, ( शुक्रवार,दिनांक २६ जानेवारी, २०१८) ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ‘वंदे मातरम्’ या गीताचे समूहगान झाले. त्यानंतर महापौरांनी सर फिरोजशहा मेहता यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी अग्निशमन दल व सुरक्षा दलाकडून महापौरांना मानवंदना देण्यात आली.

याप्रसंगी उप महापौर हेमांगी वरळीकर, महापालिका आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त महापालिका आयुक्त विजय सिंघल व ए.एल.जऱहाड, तसेच उपायुक्त निधी चौधरी, सुधीर नाईक, आनंद वागराळकर, नरेंद्र बर्डे, रमेश पवार, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) रमेश बांबळे, उप आयुक्त (अभियांत्रिकी) राजीव कुकनूर, उप आयुक्त (पर्यावरण) लक्ष्‍मण व्‍हटकर, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) तथा केइएमचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे व महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget