(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); आदिती मंगलदास यांच्या कथ्थक सादरीकरणाने मुंबईकर झाले मंत्रमुग्ध ! | मराठी १ नंबर बातम्या

आदिती मंगलदास यांच्या कथ्थक सादरीकरणाने मुंबईकर झाले मंत्रमुग्ध !

मुंबई ( ३० जानेवारी ) : भारतातील ख्यातनाम नृत्यांगना आदिती मंगलदास कथ्थक नृत्याद्वारे कथांचे सादरीकरण करत होत्या... तबला-सारंगी-सितारचे सूर निनादत होते... आणि उपस्थित प्रेक्षक अक्षरश: मंत्रमुग्ध झाले होते. निमित्त होतं कलकी फाऊण्डेशनने आयोजित केलेल्या 'रिवायत' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे.

वरळी येथील नेहरु सायन सेंटरमध्ये मंगळवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या 'रिवायत' हा कथ्थक नृत्याविष्काराच्या कार्यक्रमाला रसिकांनी प्रचंड प्रतिसाद मिळाला.

कुमुदिनी लाखिया व बिरजू महाराज यांच्या शिष्योत्तमा आदिती मंगलदास आणि नृत्यांगना पूजा पंत यांनी घडवलेल्या कथ्थक नृत्यशैलीच्या अदभूत दर्शनामुळे उपस्थित प्रेक्षक थक्क झाले. यावेळी कलकी फाऊण्डेशनच्या विश्वस्त व 'रिवायत'च्या आयोजिका शालिनी ठाकरे यांनी तरुण पिढीला कथ्थकची ओळख व्हावी, कथ्थक नृत्यशैलीतून त्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. शास्त्रीय संगीत व नृत्याला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम भविष्यातही आयोजित करणार असल्याचं शालिनी ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

विशेष म्हणजे, नृत्य, संगीत आणि सिने-नाट्यसृष्टीतील अनेक मान्यवरही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. सनईवादक पं. शैलेश भागवत, तबलावादक आदित्य कल्याणपूर तसंच उद्योजक विठ्ठल कामत, अभिनेत्री मृणाल शिल्पा शिंदे, शिल्पा तुळसकर, स्मिता जयकर, राधा सागर, पूजा वेलिंग, किरण शांताराम, अजित भुरे, नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्यासह अनेक कलावंतांनी 'रिवायत'चा आनंद उपभोगला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget